Home चंद्रपूर मनसे का. सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांच्या नेत्रूत्वात केलेल्या आंदोलनाला यश.

मनसे का. सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांच्या नेत्रूत्वात केलेल्या आंदोलनाला यश.

 

कोल वॉशरिजकडे जाणारी कोळसा वाहतूक पुन्हा सुरू.छोट्या ट्रान्सपोर्टर मालकांना मिळाला न्याय.

घूग्गूस प्रतिनिधी :-

घूग्गूस परिसरातील कोल वॉशरिज च्या ट्रान्स्पोर्टरवर सतत होत असलेला अन्याय व घूग्गूस परिसरातील गावात होत असलेले मोठे प्रदूषण बघता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांनी गुप्ता कोल वॉशरिज व वणी परिसरातील कोल वॉशरिज कडे जाणाऱ्या सर्व कोळशाच्या गाड्या अडवून रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे कोळसा वाहतूक बंद झाल्याने कोल वॉशरिज सुद्धा बंद झाल्याचे चित्र काल दिनांक 8 ओक्टोंबरपर्यंत घूग्गूस परिसरात दिसत होते. वेकोलि च्या सगळ्यात मोठ्या पैनगंगा कोळसा खानीतुन जाणारी हजारो टन कोळशाची वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे जिल्हा प्रशासन मनसेच्या या आंदोलनामुळे अडचणीत सापडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे यांच्या मध्यस्थीने या प्रकरणी गुप्ता कोल वॉशरिज व्यवस्थापन व आंदोलक रविश सिंग यांच्यात बोलणी करून छोट्या ट्रान्सपोर्टर यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामुळे आजपासून पुन्हा कोल वॉशरिज मधे कोळसा वाहतूक सुरू झाली असून मनसेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांच्या आंदोलनाला यश आल्याचे चित्र आहे.

घूग्गूस परिसरातील कोळसा वाहतूक होणाऱ्या गाड्या ह्या बाहेरून आणल्या जात आहे स्थानिक ट्रान्सपोर्टर व दोन तीन गाड्यांच्या मालकांना डावलल्या जात आहे. त्यामुळे स्थानिक ट्रान्सपोर्टर मालकांमधे मोठा संताप व्यक्त होत होता, कारण एकीकडे प्रदूषणाचा मार झेलणाऱ्या गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना जाणीवपूर्वक डावलल्या जात असल्यामुळे आता जोपर्यंत स्थानिक ट्रान्सपोर्ट यांना काम मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोल वॉशरिज सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा रविश सिंग यांच्या नेत्रूत्वात स्थानिक सर्व ट्रान्सपोर्टर यांनी घेतला होता.

या समस्येला घेऊन दिनांक 5 ओक्टोंबर ला जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मनसे तर्फे निवेदन देऊन स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना न्याय द्यावा व कोल वॉशरिज व्यवस्थापनाची मुजोरी बंद करून स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली होती. आता गुप्ता कोल वॉशरिज व्यवस्थापन व मोठ्या ट्रान्सपोर्टर असलेल्या कंपन्यांनी स्थानिक ट्रान्सपोर्टर यांना चांगला भाव देऊन त्यांना सामावून घेण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणी गडचांदुरचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या मध्यस्थीने पुन्हा पैनगंगा कोळसा खानीतुन कोळसा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याप्रसंगी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष रवि सिंग. मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बांलमवार. मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, शहर संघटक मनोज तांबेकर,अनुप यादव व इतर ट्रान्सपोर्टर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here