Home राष्ट्रीय महत्वपूर्ण :- पश्चिम मध्य रेल्वेच्या ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी 2226 जागा ची मेगा...

महत्वपूर्ण :- पश्चिम मध्य रेल्वेच्या ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी 2226 जागा ची मेगा भरती.

 

कोण अर्ज भरू शकतो, लागणारी पात्रात व अर्ज भरण्याची प्रक्रिया अशी असेल.

न्यूज नेटवर्क :-

पश्चिम मध्य रेल्वेच्या ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी 2226 जागा ची मेगा भरती. नुकत्याच रिक्त झालेल्या जागांवर होत असून या रिक्त जागा डिझेल मेकॅनिक, फिटर, वेल्डर, टर्नर, सुतार, पेंटर, मेकॅनिक, मशिनिस्ट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, पंप ऑपरेटर, हॉटेल लिपिक, हाऊस कीपर, सेक्रेटरीअल असिस्टंट, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक यासह अनेक ट्रेड्स साठी होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी wcr.indianrailways.gov.in ला भेट देऊन 11 ऑक्टोबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज भरावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.

निवड :-

अप्रेंटिसच्या या भरतीसाठी कोणतीही परीक्षा आणि मुलाखत होणार नाही. ही भरती 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. या गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल. गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पात्रता:-

मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि पोस्टशी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र (NCVT द्वारे मान्यताप्राप्त).

वय श्रेणी:-

किमान 15 आणि कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे.
ओबीसी प्रवर्गासाठी वरची वयोमर्यादा तीन वर्षे, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि शारीरिक अपंगांसाठी दहा वर्षे शिथिल केली जाईल.

शिष्यवृत्ती: नियमानुसार दिली जाईल.

अर्ज शुल्क ;–

सामान्य श्रेणीच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियोक्ता कोणत्याही प्रशिक्षणार्थीला नोकरी देण्यास बांधील नाही, किंवा प्रशिक्षणार्थी नियोक्त्याने देऊ केलेला कोणताही रोजगार स्वीकारण्यास बांधील नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here