Home वरोरा शैक्षणिक :- शाळा सुरु; पण बसेस बंद,तालुक्यातील ग्रामीण भागातील विदारक स्थिती,

शैक्षणिक :- शाळा सुरु; पण बसेस बंद,तालुक्यातील ग्रामीण भागातील विदारक स्थिती,

 

एस टी च्या फेऱ्या सुरू करण्याची विद्यार्थी व पालकांची मागणी.

वरोरा ता.प्र.मनोहर खिरडकर

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील एस.टी. फेऱ्या बंदच असल्याने परगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाने विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शालेय वेळात एसटी फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थी-पालकांतून होत आहे.

जिल्ह्यातील प्रत्त्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती असून वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेजसाठी नजीकच्या मोठ्या गावात शिक्षणासाठी जातात. वरोरा, चंद्रपुर यांसारख्या मोठ्या शहरामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या एस. टी. च्या ग्रामीण फेल्या महामंडळाने अद्यापही सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. शाळा व एस.टी. प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून बसेस सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांसह शिक्षकांकडून सुद्धा होत आहे.

कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. दि. ४ ऑक्टोबरपासून शाळांतील किलबिल सुरू झाली आहे. शैक्षणिक कामकाज सुरू झाल्याने विद्यार्थी मात्र आंनदी आहे. शानाच्या निर्णयानुसार ४ ऑक्टोबरपासून ज्ञानमंदिरे सुरू झाली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबरपासून राज्यभरातील मंदिरेही सुरू होत आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांसह भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बसफेरी त्वरीत सुरु करावी अशा मागणी चे निवेदन यापुर्वि अनेक संबंधित विभागाला देण्यात आले पण त्याचा उपयोग काहीही झाला नाहि त्यामुळे आतातरी आमची गरीबाची बस सुरू करावी अशी आर्त हाक विद्यार्थासह पालक देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here