Home चंद्रपूर खळबळजनक :- ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसाच्या बैनर मधून पालकमंत्री वडेट्टीवार यांचा...

खळबळजनक :- ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसाच्या बैनर मधून पालकमंत्री वडेट्टीवार यांचा फोटो गायब?

 

काँग्रेस कार्यकर्त्यांची चूक की जाणीवपूर्वक फोटो केला गायब? चर्चेला उधाण.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्राचे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांचा केवळ चंद्रपूर जील्ह्यातच नाही तर गडचिरोली गोंदिया भंडारा व नागपूर इथे दरारा आहे व पक्ष संघटनेत त्यांची महत्वपूर्ण जबाबदारी ते चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. पूर्व विदर्भात काँग्रेस ला गती देण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले व मोठ्या प्रमाणात नव्या युवा कार्यकर्त्यांना त्यांनी पक्षात जोडून पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला, मात्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहरात लावण्यात आलेल्या काही शुभेच्छा बैनर मधे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटोच गायब असल्याने काँग्रेसच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा बैनर मधून फोटो गायब केला की जाणीवपूर्वक तो टाकला नाही याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये आपसी वैर असले तरी जेंव्हा पक्षाचा एखादा बैनर बनतो तेंव्हा मात्र सगळ्या पदाधिकारी आणि नेत्यांचे फोटो राजकीय प्रोटोकॉल म्हणून लावल्या जाते. तसं बघता माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर आहे पण एका मंचावर असताना एकमेकांचा ते आदर करतात आणि पक्षाच्या बैनर मधे प्रोटोकॉल पाळल्या जातो पण मग काँग्रेस ला जिल्ह्यात नवसंजीवनी देणाऱ्या व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांचा काँग्रेस च्या बैनर मधून फोटो गायब कसा काय होतो? हे न समजणारे कोडे असून यामुळे काँग्रेस च्या अंतर्गत गोटात काहीतरी वेगळी खिचडी शिजत असल्याचे चित्र दिसत आहे, एवढे मात्र खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here