एसीबीच्या जाळ्यात खटके अडकल्यानंतर भांदककर खुश का? काय आहे राज?
भद्रावती प्रतिनिधी :-
भद्रावतीचे तहसीलदार डॉ. नीलेश खटके हे काल एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर नायब तहसीलदार भांदककर हे फार खुश होते असे प्रत्यक्षदर्शीने चर्चेतून सांगितले त्यामुळे तहसीलदार खटके यांना एसीबीच्या जाळ्यात अडकवण्यासाठी फिर्यादीसोबत नायब तहसीलदार भांदककर यांची साठगांठ तर नसावी? असा संशय बळावला आहे. अगोदरच नायब तहसीलदार भांदककर यांच्या भ्रष्ट कारवाया जगजाहीर आहे, त्यात मुधोली वायगाव परिसरात रेती माफियांकडून हप्ता वसुली करत असल्याची बातमी समोर आली होती एवढेच नव्हे तर सातबारा फेरफार करिता 20-20 हजार रुपये ते घेत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने लाईव्ह सांगितले आहे, त्यामुळे तहसीलदार खटके सोबतच भांदककर यांच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
भद्रावती शहरात व तालुक्यात अवैध मुरूम व रेती उत्खनन जोरात सुरू असून त्याचा फायदा घेत तहसीलदार खटके हे अवैध हप्ता वसुली करीत होते, मात्र त्यांच्यापुढे दोन पाऊले पुढे असणारे नायब तहसीलदार भांदककर यांच्यावर एसीबीची कारवाई अपेक्षित होती पण तहसीलदार खटके यांनी नायब तहसीलदार भांदककर यांच्या हप्ता वसुलीवर ब्रेक आणल्याने स्वतः नायब तहसीलदार भांदककर हे तहसीलदार खटके एक लाख रुपये वसुली करतात असे सगळ्यांना सांगत सुटले होते अर्थात तहसीलदार खटके सोबत आर्थिक देवाणघेवाण बाबत भांदककर यांच्याशी खटके उडत होते हे जाहीर होते,त्यामुळे या प्रकरणात नायब तहसीलदार भांदककर जे खटके यांच्या खुर्चीवर बसण्याची अपेक्षा ठेऊन आहे त्यांची पण चौकशी व्ह्यायला हवी अशी मागणी त्रस्त जनतेकडून होत आहे.