Home चंद्रपूर अपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना मनसे कामगार सेनेची साथ.

अपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना मनसे कामगार सेनेची साथ.

 

ट्रान्सपोर्टर चड्डा कडून प्रत्येकी 5.50 लाखांची मदत तर जखमीचा पूर्ण खर्च उचलणार.

घूग्गूस प्रतिनिधी :-

काल वेकोली वणी क्षेत्राच्या अंतर्गत संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर एका ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एकाला गंभीर दुखापत झाली होती दरम्यान गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले. पण अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाना ट्रकचे मालक चड्डा यांच्याकडून तत्काळ आर्थिक मदत मिळणे आवश्यक असताना ती मिळाली नसल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांच्या पुढाकाराने व इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या मध्यस्थीने अखेर मृत व्यक्तींना 5.50 लाख व गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीचा पूर्ण वैद्यकीय खर्च चड्डा ट्रान्सपोर्टर करणार असल्याची ग्वाही रविश सिंग यांनी चर्चे नंतर देऊन मृतकांच्या नातेवाईकांना चेक सुद्धा बहाल केला या प्रसंगी विवेक बोढे, रोशन पचारे,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व इतर राजकीय नेते मंडळी उपस्थित होती.

या झालेल्या अपघातात एमएच 34 5080 या ट्रॅक्टरला 18 चाकी ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 9362 ने जोरदार धडक दिली होती व या धडकेत ट्रॅक्टर चालक मनोज, हेल्पर रुपेश बारसागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर अन्य एक गंभीर जखमीला चंद्रपूर च्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या झालेल्या अपघाताच्या घटनास्थळी राजकीय नेते मंडळी गोळा झाली होती मात्र मनसे कामगार सेनेच्या आक्रमक शैलीमुळे चड्डा ट्रान्सपोर्टर यांनी अखेर मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या हातात प्रत्यक्ष चेक देण्यात  आले.व त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना ते सुपूर्द केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here