Home चंद्रपूर ब्रेकिंग :- वेकोलि वणी परिसरातील घुग्घुस बायपास रोडवर भीषण अपघात.

ब्रेकिंग :- वेकोलि वणी परिसरातील घुग्घुस बायपास रोडवर भीषण अपघात.

 

ट्रकची ट्रक्टरला धडक दोन जण जागीच ठार तर एक गंभीर.

घूग्गूस प्रतिनिधी :-

वेकोली वणी क्षेत्राच्या अंतर्गत संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर एका ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे.गंभीर जखमीला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती असून घूग्गूस पोलीस यांचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एमएच 34 5080 या ट्रॅक्टरला 18 चाकी ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 9362 ने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर चालक मनोज, हेल्पर रुपेश बारसागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी आहे. या झालेल्या अपघाताच्या घटनास्थळी घूग्गूस परिसरातील राजकीय नेत्यांची फौज जमा झाली व इतर नागरिक पण गोळा झाले दरम्यान पोलीसानी यावर नियंत्रण आणून गर्दीला पांगविण्यासाठी प्रयत्न चालवले आहे.

Previous articleखळबळजनक :- भद्रावतीचे तहसीलदार डॉ नीलेश खटके एसीबी च्या जाळ्यात.
Next articleअपघातात मरण पावलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना मनसे कामगार सेनेची साथ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here