तेली समाजाच्या संताजी भिसी गृपतर्फे व समाज बांधवांकडून वैयक्तिक मदत.
चंद्रपूर प्रतिनिधी – :
डॉक्टर हा समाजाचा आरोग्याच्या संकटकाळी देव समजला जातो पण तो देव होण्या अगोदर काय काय अडचणीला समोरे जावे लागत असते ते त्यालाच माहीत पण यामध्ये समाजाचा सहभाग असेल तर त्यांच्या डॉक्टर होण्याला पुन्हा अर्थ मिळतो अशाच एका भावी डॉक्टर ला तेली समाज बांधवांची झालेली आर्थिक मदत समाजाला नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. समाजात असे अनेक विद्यार्थी असतात ते परिस्थितीने गरीब असतात पण शिकण्याची व काहीतरी करून दाखविण्याची धडपड त्यांच्यात असते अशा वेळी जर समाजातील लोकांनी मदतीचा हात दिला तर एका विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या चंद्रपूर येथील स्नेहा वाघमारे हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई झाली होती पण पुढील शिक्षणासाठी जायचे कसे ?हा यक्ष प्रश्न तिच्यासमोर होता परंतु समाजातील दानशूरांनी तिच्या हाकेला धावून जावून तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला उजाळा दिला त्यामुळे त्या मुलीच्या परिवारातर्फे आनंद व्यक्त होत आहे. या भावी डॉक्टरला पुढील शिक्षण घेण्याकरिता संताजी भिसी गृपतर्फे ५१ हजार तर इतर समाज बांधवांकडून वैयक्तिक मदत करून यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी राजेश वा. बेले, विजय अगडे, तिघारे, ताराचंद देऊरमल्ले, डॉ. महेश भांडेकर, व्ही. आर. जे. गृप, रामदास बानकर, सुरेश भुते, राजेंद्र पोटदुखे यांनी वयक्तिक तर संताजी भिसी २०२२ या गृपने ५१ हजार रुपये मदत दिली आहे. आज स्थानिक भिवापूर वार्ड येथील साई मंदिर येथे छोटेखानी कार्यक्रमात स्नेहा वाघमारे हिच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सूर्यकांत खनके, नगरसेवक देवेंद्र बेले, नामदेव वरभे, गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, सचिन कुंभलकर, शेखर जुमडे, बिजवे, निलेश बेलखंडे, शैलेश जुमडे, राजेंद्र रघाताटे, जितेंद्र इटनकर, नितेश जुमडे, रवी लोणकर, विकास घटे, अनिल आंबोरकर, विनोद कावळे यावेळी उपस्थिती होते.
आपण ही तेली समाजाच्या वतीने मला केलेल्या मदतीला प्रेरित होऊन डॉक्टर झाल्यावर समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी व रूग्णांची मदत करित राहिल असा निर्धार स्नेहा वाघमारे हिने केला आहे.भविष्यातही अशा प्रकारे तेली समाजबांधव उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणीत असल्यास समाज बांधव मदत करतील, अशी ग्वाही यावेळी तेली समाज बांधवानी दिली.