Home सांस्कृतिक महोत्सव :- येणाऱ्या शिवजयंती उत्सवाला सरकारच्या काय राहणार आहे अटी आणि शर्ती...

महोत्सव :- येणाऱ्या शिवजयंती उत्सवाला सरकारच्या काय राहणार आहे अटी आणि शर्ती ?

मुंबई सह विदर्भात अशी राहणार स्थानिक प्रशासनाकडून शिवजयंतीची परवानगी.

विशेष बातमी :-

येणाऱ्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली असल्याची माहिती असून यावर्षी शिवजयंती साजरी करण्याचा शिवप्रेमीचा इरादा पूर्ण होणार आहे.

दरम्यान आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

Previous articleप्रेरणादायी :- समाजातील भावी डॉक्टरला तेली बांधावाकडून आर्थिक मदत.
Next articleखळबळजनक :-वरोरा शहरात भगवान शंकरजीची मूर्ती धर्मभ्रष्ट व्यक्तीने तोडल्याने खळबळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here