Home क्राईम स्टोरी खळबळजनक :-वरोरा शहरात भगवान शंकरजीची मूर्ती धर्मभ्रष्ट व्यक्तीने तोडल्याने खळबळ.

खळबळजनक :-वरोरा शहरात भगवान शंकरजीची मूर्ती धर्मभ्रष्ट व्यक्तीने तोडल्याने खळबळ.

राजकीय वारे वाहत असताना झालेला हा संतापजनक प्रकार कुणाच्या इशाऱ्यावर ?

वरोरा प्रतिनिधी :

काही दिवसांतच येणाऱ्या भगवान शंकरजी यांच्या शिवरात्री महोत्सवाची तयारी जोरात सुरू असताना वरोरा येथील बाजार वार्डात एका धर्मभ्रष्ट व्यक्तीने भगवान शंकरजीची मूर्ती तोडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून हा संतापजनक प्रकार करणाऱ्यांची मानसिकता नेमकी काय आहे ? याचा शोध पोलीस तपासात लागेलच पण येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असले प्रकार कुणाच्या इशाऱ्यावर घडवले जात आहे ? याचा तपास लावण्याची खरी गरज असल्याची प्रतिक्रिया जनसामान्य माणसात उमटत आहे.

वरोरा शहर हे नेहमीच शांतप्रिय आहे पण काही वर्षांपूर्वी गणेश विसर्जन वेळी झालेला पोलिसांचा लाठीचार्ज अजूनही येथील नागरिक विसरले नाही मात्र ऐन शिवरात्री उत्सवाच्या अगोदर घडलेला हा प्रकार निश्चितच राजकीय स्टंट असल्याचा प्रकार दिसत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला गेला असून हा संतापजनक प्रकार पोलीस कसा उघड करतील याकडे वरोरा वाशियांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here