Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील परिसरात वाघांनी घेतला कामगाराचा बळी.

ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील परिसरात वाघांनी घेतला कामगाराचा बळी.

वाघांची दहशत पसरली सगळीकडे वनविभाग मात्र साखर झोपेत

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात वाघाचा धुमाकूळ सुरू असून काल १६ फेब्रुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले व त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान वाघांचे हल्ले वाढले असून वनविभाग मात्र साखर झोपेत असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विज निर्मिती केंद्रात काल रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून परत घराकडे जात असलेल्या एका कंत्राटी कंपनीच्या मजुरांवर हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोजराज मेश्राम वय 59 असे म्रुत्य व्यक्तीचे नाव असून ते वैद्यनगर तुकुम येथे राहत होते.व ते
सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते. युनिट क्र 8 व 9 मधील बेल्टचे काम करीत असल्याची माहिती आहे. काल रात्री आपले काम करून घराकडे जात असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा जागीच म्रुत्यु झाला असुन अजूनपर्यंत त्यांचे शव मिळालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here