Home चंद्रपूर वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकजजी भोयर यांचे हस्ते

वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकजजी भोयर यांचे हस्ते

सुप्रसिद्ध तबला वादक अनिल दाउतखानी यांचा सत्कार

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर

वर्धा:– सांस्कृतिक व सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू असलेला संपूर्ण महाराष्ट्रातुन वर्धा जिल्हा आहे,आणि आजही वर्धा जिल्ह्यात धार्मिकतेच्या वाटेने चालुन रूढी परंपरा कायम ठेवली आहे,सामाजिकरित्या कार्य करून संस्कृती जागृत करण्याचे प्रयत्न आजही सुरू आहे, अशातच एक सामान्य कुटुंबातील जन्माला आलेले *अनिल दाउतखानी* यांनी तबला वाजवून मराठी भाषेची संस्कृती संगीत कला, भजनावली आणि इतर क्षेत्रातील सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट तबला वादक माध्यमातून आपली कला अवगत करून जबाबदारी स्वीकारली, आणि या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध तबला वादक म्हणून आपली ओळख निर्माण केली,
या कलावंताला संगीत क्षेत्रात अविरत सेवा करीत आहात म्हणून माननीय, नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्य औचित्य साधून संगीत क्षेत्रात भरीव करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा-सेलू विधानसभा क्षेत्रातील आमदार डॉ, पंकज भोयर यांनी सन्मानित करून,न्यू हायस्कूल वर्धा येथे सुप्रसिद्ध तबला वादक म्हणून कार्याची पावती समजून श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आले, यावेळी खासदार रामदासजी तडस, प्रदीपजी बजाज यांचेही हस्ते सत्कार करण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here