Home चंद्रपूर सनसनी :- संतोष रावत यांच्यावर गोळी झाडंणाऱ्या आरोपीकडून आले सनसनिखेज खुलासे?

सनसनी :- संतोष रावत यांच्यावर गोळी झाडंणाऱ्या आरोपीकडून आले सनसनिखेज खुलासे?

न झाडलेल्या दुसऱ्या गोळीचे रहस्य काय? कारण आले समोर ?

चंद्रपूर :-

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर दिनांक ११ मे रोजी मुल येथे गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला त्या प्रकरणातील आरोपी यांना पोलिस विभागाने अटक केली होती, प्राथमिक तपासात आरोपीनी बयान दिला की वेकोलि मधे नौकरी लावून देण्यासाठी संतोष रावत यांनी 6 लाख रुपये घेतले पण नौकरी लावून दिली नाही अशी माहिती खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली, त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पुढील तपासात काय समोर येते ते बघू असे म्हणून त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान आता तपासाची चक्रे फिरू लागली असून आरोपी कडून रोज नवनवे खुलासे केल्या जातं आहे. संतोष रावत यांच्यावर एक गोळी झाडल्यानंतर दुसरी गोळी पण आरोपी झाडायला गेला पण दुसरी गोळी पिस्तूल मधेच अडकली आणि त्यामुळेच आरोपीकडून दुसरी गोळी झाडल्या न गेल्यामुळे संतोष रावत यांचा जीव वाचला असे सूत्रांकडून कळले आहे.

वेकोलित नोकरी लावून देतो म्हणून सहा लाख रुपये संतोष रावत यांनी घेतल्याचा आरोप आरोपी राजवीर यांनी केला होता पण माझा वेकोलिशी काडीमात्र संबंध नाही मी आरोपींना ओळखत नाही त्यामुळे मुख्य सूत्रधार यांच्या सांगण्यावरून ही कहाणी तयार करण्यात आल्याचा दावा पत्रकार परिषदेत संतोष रावत यांनी केला होता. पण आता खरी परिस्थिती पोलीस तपासात समोर येत असून आरोपी राजवीर यांनीच दोन व्यक्तीकडून 3-3 लाख घेऊन वेकोलि मधे नौकरी लावून देतो म्हणून ग्वाही दिली असल्याचे तथ्य समोर येत आहे. दरम्यान या वेकोलिमधे नौकरी लावून नेमकं कोण देतय, व वेकोलिशी कुणाचा संबंध आहे ? हे जगजाहीर असून या संदर्भात पोलिसांचा तपास वेकोलि च्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला तर खरा सूत्रधार समोर येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here