Home चंद्रपूर दुर्दैवी :- चिमूर तालुक्यातील मांसळ परिसरात बैलांची केली वाघांनी शिकार.

दुर्दैवी :- चिमूर तालुक्यातील मांसळ परिसरात बैलांची केली वाघांनी शिकार.

नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी.

चिमूर प्रतिनिधी /विनोद खडसंग :-

वन विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत असून जंगलातील वाघ आता शेतकऱ्यांच्या बांधावर यायला लागले आहे असाच दुर्दैवी प्रकार आज चिमूर तालुक्यातील मांसळ येथे घडला असून आनंदराव नारायण गायकवाड यांच्या शेतीचा बैलाच्या शिकार वाघाने केलाची दुर्दैवी घटना आज दिनांक २९ ऑक्टोंबर ला सकाळी समोर आली आहे.

शेतशिवारात आता जंगली हिंस्र प्राणी त्यातच वाघ बिबट हे शिरायला लागले असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. मांसळ येथे जवळपास ६०,००० रुपये किंमतीचा बैल वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने या परिसरात वाघांची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान नुकसान भरपाई म्हणून किमान ६०,००० रुपये वन विभागाने द्यावे अशी मागणी शेतकरी आनंदराव गायकवाड यांनी केली आहे.

Previous articleपरप्रांतीय ट्रॅक्टर्स मालकांच्या विरोधातील मनसेच्या निवेदनाची उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली दखल.
Next articleसन्मान :-डॉ. अशोक जीवतोडे यांना  विदर्भ  पुरस्काराने सन्मानित  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here