Home वरोरा परप्रांतीय ट्रॅक्टर्स मालकांच्या विरोधातील मनसेच्या निवेदनाची उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली दखल.

परप्रांतीय ट्रॅक्टर्स मालकांच्या विरोधातील मनसेच्या निवेदनाची उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली दखल.

बेकायदेशीर परप्रांतीय ट्रॅक्टर व पीक काढणी यंत्र (हडम्बे) येत असलेल्या वाहनाची तपासणी करून त्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे आदेश.

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय ट्रॅक्टर्स व पीक काढणी यंत्र हडम्बे हे राजस्थान व मध्यप्रदेशातून येत असून त्यामुळे स्थानिक ट्रॅक्टर्स व हंडबे धारक बेरोजगार युवकांचा रोजगार हिसकवला असल्याने दोन्ही तालुक्यातील किमान 200 ते 300 स्थानिक बेरोजगार युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली व परप्रांतीय ट्रॅक्टर्स व पीक काढणी यंत्र बंद करण्याची मागणी केली त्यामुळे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या पुढाकाराने दि. 10.10.2022 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन परप्रांतीय ट्रॅक्टर्स व हंडबे धारक यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांची वाहने जप्त करण्याची मागणी केली होती. दरम्यान सदर निवेदनाची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दखल घेऊन एक आदेश पारित केला व परप्रांतीय वाहनधारकांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे आता राजस्थान व मध्यप्रदेश प्रांतातील ट्रॅक्टर्स व हंडबे वाहनांची धरपकड होऊन संबंधित चालक मालक यांच्यावर कारवाईहोणार असल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठीकाही स्थानिक लोक या परप्रांतीय लोकांना साथदेऊन स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारावरगदाआणत असल्याने ती कोण लोकंआहे यांचाही शोध घेतल्या जाणार आहे.

वरोरा व भद्रावती या दोन तालुक्यात राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातून काही व्यापारी ट्रॅक्टर सह (हडम्बे) या तालुक्यात विनापरवाना व वाहनाचे कोणतेही कागदपत्रे वैध नसुन ही वाहने चालवित असल्याबाबतची तक्रार या कार्यालयास प्राप्त झाली आहे. तरी अशा परप्रांतीय वाहतुक करणारी वाहने आढळल्यास अशा वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करावी व कलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असा आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी काढला असून याच्या प्रती कलबिरसिंग कलसी, मोटार वाहन निरिक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर व नरेंद्र उमाळे, सहा मोटार वाहन निरिक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांना कारवाई करण्यासाठी दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here