Home चंद्रपूर पोलीसनामा :- गॄह विभागाच्या शासन निर्णयाचा बल्लारपूर पो. स्टे. मोहररला पडला विसर...

पोलीसनामा :- गॄह विभागाच्या शासन निर्णयाचा बल्लारपूर पो. स्टे. मोहररला पडला विसर ?

ठाणेदार उमेश पाटील यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह? पोलीस कर्मचारी लाभांपासून वंचित.

चंद्रपूर प्रतिनिधी ;-

महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळाने पोलीस कर्मचारी व पोलीस निरीक्षक पदापर्यंत असलेल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नैमित्तिक रजेत दिनांक ३/१०/२०२२ च्या बैठकीत वाढ केल्याचे परिपत्रक जारी केले असतांना जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशनचे मोहरर मनोहर मडावी यांनी येथील पोलीस कर्मचाऱ्यांना या लाभांपासून वंचित ठेवल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या बाबतीत ठाणेदार उमेश पाटील यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान ठाणेदार उमेश पाटील यांची परिक्षेत्र बदली व आता जिल्हा बदली असताना त्यांचा राजकीय नेत्यांना हाताशी धरून इथेच मुक्काम ठोकण्याचा इरादा असल्याचे उघड होतं आहे. अगोदरच एका भाजप नेत्यांचा वाढदिवस पोलीस स्टेशन मधे साजरा करण्याच्या त्यांच्या कृत्यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या तर्फे चौकशीचे आदेश आहे त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या नैमित्तिक रजेपासून वंचित ठेवल्याचा ठपका पोलीस निरीक्षक उमेश पाटील व मोहरर मनोहर मडावी यांच्यावर असल्याने शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्यां ठाणेदार पाटील यांची जिल्हा बदली करण्यात यावी अशी मागणी होतं आहे.

पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एका कैलेंडर वर्षात १२ नैमित्तिक रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला व त्यानुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी / कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षात १२ दिवस नैमित्तिक रजा शासन निर्णय गृह विभाग, क्रमांक एलव्हीई ०२९९ / प्र.क्र.१५१/पोल-५, दिनांक २३.०३.२००० अन्वये अनुज्ञेय करण्यात आल्या होत्या दरम्यान पोलीस दलातील कामकाजाचा व्याप, प्रतिदिन ०८.३० तासांपेक्षा अधिक वेळ थांबून कर्तव्य पार पाडण्याबाबत जबाबदारी, विविध सण व उत्सवांच्या अनुषंगाने असलेले बंदोबस्त तसेच व्हीआयपी व अन्य बंदोबस्तांमुळे एकूण कर्तव्य कालावधीत अपरिहार्यपणे वाढ होणारा कालावधी इ.बाबी विचारात घेता, पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर व कार्यक्षमतेवर परिणाम होतो. पोलीस दलातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, आरोग्य व कौटुंबिक स्वास्थ्य या दृष्टिकोनातून पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पोलीस दलातील अधिकारी/कर्मचा-यांच्या रजेबाबत दिनांक ३/१०/२०२२ ला मंत्रिमंडळातर्फे निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकारी/कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० (वीस) दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात येत असल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालये व स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयात हया आदेशाचे संदेश पोहचविण्यात आले असून www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर याबद्दल सर्व माहिती उपलब्ध आहे.

Previous articleधक्कादायक :- ऐन दिवाळीच्या दिवशी वाघाने हल्ला करून युवकाचा घेतला बळी.
Next articleपरप्रांतीय ट्रॅक्टर्स मालकांच्या विरोधातील मनसेच्या निवेदनाची उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली दखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here