माजरी सारख्या लोकवस्तीत वाघांचे वास्तव्य हे ठरत प्रचंड धोकादायक. वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी.
माजरी प्रतिनिधी :-
भद्रावती तालुक्यातील माजरी सारख्या दाट लोकवस्तीत ऐन दिवाळी सनाच्या दिवशी वाघाने एका तरुण युवकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी उघडकीस सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे तर वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही वर्षांपूर्वी रेती तस्करांच्या ट्रकच्या धडकेने एक वाघ पुलाखाली पडून नंतर त्याचा मृत्यु झाला होता दरम्यान त्या प्रकारणाची चौकशी सुद्धा झाली पण चौकशी अधिकारी त्यांच्या अंतिम लक्षापर्यंत पोहचू शकले नाही. अर्थात या क्षेत्रात वाघांचा अधिवास असल्याने त्यांच्या पासून मनुष्यहानी होऊ नये या संदर्भात वन विभागाने सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे पण ते होताना दिसत नसल्याने वाघांच्या हल्ल्याचे पुन्हा किती बळींची अपेक्षां वनविभागाला आहे असा प्रश्न येथील नागरिक विचारु लागली आहे.
माजरी येथील नागरी वस्तीत वाघाने घुसखोरी करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच (२४ ऑक्टोबर) एकाचा बळी घेतला. दिपू सियाराम सिंग महतो (३०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिपू सिंग महतो हा खासगी कंपनीमध्ये कार्यरत होता. रात्रपाळी असल्याने तो न्यू हाऊसिंग कॉलनी येथील घरून कंपनीत कामावर जात होता. याचवेळी एका घरामागे दबा धरून बसलेल्या वाघाने दिपूवर हल्ला चढविला. वाघाने त्याला फरफटत झुडपात नेत त्याच्या नरडीचा घोट घेतला. या हल्ल्यात दिपू जागीच ठार झाला.