Home चंद्रपूर खळबळजनक :- पत्रकारांच्या दिवाळीला उजाळा देणारी उपप्रादेशिक परिवहन विभागाची यावर्षी दांडी ?

खळबळजनक :- पत्रकारांच्या दिवाळीला उजाळा देणारी उपप्रादेशिक परिवहन विभागाची यावर्षी दांडी ?

लाखों रुपयांची दरमहा बेकायदेशीर हप्ता वसुली व पासिंगच्या नावाखाली लूट करणाऱ्या आरटीओच्या टोळीचा पर्दापाश होणार ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार मार्गाने काळा पैसा तो सुद्धा नियमानुसार जमा करण्यात पटाईत असणारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यावर्षी पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा जाहिराती न दिल्याने प्रसारमाध्यमांच्या रडारवर आले असून लाखों रुपयांची दरमहा बेकायदेशीर हप्ता वसुली व पासिंगच्या नावाखाली लूट करणाऱ्या या आरटीओच्या टोळीचा पर्दापाश होणार कां ? या चर्चेला उधाण आले आहे. एरव्ही मोजक्या प्रादेशिक दैनिक वर्तमानपत्राच्या जिल्हाप्रतिनिधींना हप्ता देणारी आरटीओ व्यवस्था दिवाळीच्या सणाला जिल्ह्यातील सर्व छोट्या मोठ्या पत्रकारांना जाहिराती च्या नावाखाली पैकेट देऊन गोड शुभेच्छा देत होते, मात्र यावर्षी आरटीओ कार्यालयाने पत्रकारांचे पत्रकं ठेऊन तर घेतले, मात्र पैशाची पाकिटे द्यायची वेळ आली तेंव्हा ऐन वेळेवर त्यांनी दांडी मारली असल्याने पत्रकारांच्या समूहात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्याला असणारी औधोगिक ओळख आणि उद्धोगात असणारी मोठ्या प्रमाणांत वाहतूक व्यवस्था व रस्त्यांनी चालणाऱ्या लाखों वाहनांची संख्या बघता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर हे भरगच्च वर्दळीचं असणार याबद्दल शंका नाही. त्यांतच चालक परवाना व विविध प्रकारची या कार्यालयात वाहनांची नोंदणी आणि पासिंग ही व्यवस्था एजंट मार्फत होतं असल्याने हे कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे पुढारी व नामांकित पत्रकार मंडळीं येथे चंदा वसुली करिता येतात तर लोकप्रतिनिधींचा इथे काही वाटा असतो अशी सुद्धा चर्चा आहे. एकूणच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे नेहमीच वादात असल्याने एनकेन प्रकारे वर्तमानपत्रातील बातम्यांची ते हेड लाईन बनत असते हे सर्वश्रुत आहेत.

आरटीओची दिवाळीच्या निमित्याने बेकायदेशीर वसुली ?

जिल्ह्यातील आरटीओ कार्यालय म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे एजंट लोकांनी व्यापलेलं असून जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या बघता त्याची होणारी पासिंग. दररोज होणाऱ्या नवीन वाहनांची नोंदणी व त्यापासून मिळणारा कराचा भरणा आणि कागदपत्रांसाठी अतिरीक्त भरावा लागणारा भ्रष्ट मार्गाचा दंड यापासून दररोज आरटीओ च्या कार्यालयात लाखों रुपये गैरमार्गाने वसूल होतं असते. शिवाय जिल्ह्यातील मोठे ट्रान्सपोर्ट व कोळसा खाणीत असणाऱ्या मशिन्स या सर्वांची बेकायदेशीर आरटीओ ला दरमहा लाखों रुपयांची रसद पोहचवली जातं असते. त्यांतच आता दिवाळीच्या निमित्याने जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट कंपन्या व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून लाखों रुपये पत्रकारांना जाहिरात देण्याच्या नावाखाली वसूल केल्याची चर्चा असून आता आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना खो देऊन दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. दरम्यान कुठल्या ट्रान्सपोर्ट कडून किती वसुली दिवाळीच्या निमित्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी आणली याबद्दल अनेक पत्रकारांकडे माहिती असल्याने हे आकडे येणाऱ्या काळात आरटीओ साठी कर्दनकाळ ठरू शकतात एवढे मात्र खरे.

Previous articleब्रेकिंग :- चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची बदली.
Next articleधक्कादायक :- ऐन दिवाळीच्या दिवशी वाघाने हल्ला करून युवकाचा घेतला बळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here