Home चंद्रपूर ब्रेकिंग :- चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची बदली.

ब्रेकिंग :- चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची बदली.

रवींद्रसिंग एस. परदेशी – उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई यांना चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

20 ऑक्टोम्बरला महाराष्ट्र शासन गृह विभागाने अनेक अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबईच्या रवींद्रसिंह परदेशी यांची बदली करण्यात आली आहे.

बदली आदेशात सध्यातरी विद्यमान पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना पदस्थापना दिली नाही. IPS रवींद्रसिंह परदेशी हे काही वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात SDPO म्हणून रुजू झाले होते.

मागील 2 वर्षात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या
कार्यकाळात अनेक गुन्ह्याचा उलगडा, व गंभीर गुन्ह्यातील आरोपीना पकडण्यास यश मिळाले होते. एकूणच पोलीस अधीक्षक साळवे यांचा कार्यकाळ समाधानकारक राहिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील ४३ आयपीएस आणि आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून अधिका-यांच्या बदल्या आणि रिक्त जागांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here