Home वरोरा संतापजनक:- हिंदू देवी देवता यांच्या फोटोची विटंबना. महाराष्ट्र सैनिकांनी केली पोलखोल.

संतापजनक:- हिंदू देवी देवता यांच्या फोटोची विटंबना. महाराष्ट्र सैनिकांनी केली पोलखोल.

नगरपरिषद प्रशासन साखर झोपेत की जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? कारवाई करण्याची मनसेची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

शहारातील मध्यभागात असलेल्या तलावांच्या पाण्यात व कचऱ्यांच्या ढिगाऱ्याखाली हिंदू देवी देवतांचे जुने फोटो शहरातील नागरिकांनी टाकून एक प्रकारची हिंदू देवी देवतांची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार आनंद गेडाम व आकाश काकडे यांनी समोर आणल्याने नगरपरिषद प्रशासन साखर झोपेत आहे की जाणीवपूर्वक त्यांनी याकडे दुर्लक्ष केले याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वरोरा शहरात एकच मोठा तलाव असून या तलावाचे सौंदर्यीकरण ना करता उलट या तलावाला घाणीच्या हवाली स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. या तलावांच्या किनाऱ्यांवर काहींनी अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटले आहे तर काही ठिकाणी मूत्रालय व शौचालयाचा अड्डा बनवला गेला आहे. दरम्यान नगरपरिषद प्रशासनाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची ढिचाळ कामगिरी असल्याने या ठिकाणाच्या या घाणीमुळे आजुबाजुला असणाऱ्या दुकानदार व रहदारी करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतं आहे, पण तलावाचे स्वतःच्या जागेत माती टाकण्यासाठी खोलीकरण करण्याचा ठराव नगरपरिषद सत्ताधारी व प्रशासनाने केला परंतु तलावाचे सौंदर्यीकरण मात्र तत्कालीन नगरपरिषद सत्ताधारी यांनी टाळले असल्याने या ठिकाणी कचरा टाकण्याचे ठिकाण समजून शहरातील नागरिक हिंदू देवी देवतांचे खराब झालेले फोटो टाकून हिंदू देवी देवतांची विटंबना करतात हे हिंदू संस्कृतिला ना शोभणारे असल्याने या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र सैनिक आकाश काकडे आनंद गेडाम व कृष्णा डोर्लिकर यांनी केली आहे.

Previous articleशेतकऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी “ओला दुष्काळ” जाहीर करून मदत करा.
Next articleब्रेकिंग :- चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची बदली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here