Home चंद्रपूर युवा सेनेत गडबड ? कामाचा “आलेख” वाढल्याने पत्ता होतोय का कट?

युवा सेनेत गडबड ? कामाचा “आलेख” वाढल्याने पत्ता होतोय का कट?

युवा सेनेत मोठे फेरबदल चिंतेचा व चिंतनाचा विषय, शिवसेना पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राजकारणात कोण कुठे काय कोणती भूमिका घेइल याचा नेम नसतो अगदी हवामानाच्या वेगाने राजकारणात बदल घडत असते त्यातही आपल्या पेक्षा लहान माणसाने पदाधिकाऱ्याने प्रगति केलेली अनेकांना खटकत असते, त्यात नवीन कार्यकर्त्याचा व पदाधिकाऱ्यांचा कामाचा “आलेख“ वाढला की वरिष्ठांना एकाचे दोन सांगून पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातो हे काही नवीन नाही, असंच काहीसं चित्र नुकत्याच शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या चंद्रपूर जिल्हातील युवा सेनेत झालेल्या फेरबदलावरून दिसून येत आहे .

महाराष्ट्राच्या राजकारण दररोज नवं नवीन घडामोडी घडत आहे . एकीकडे शिवसेनेचे दोन गट तयार झाल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना विभागली गेली आहे . स्वतःला निष्ठावान म्हणणारे सुद्धा ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात शामिल होत आहे . आणि जे निष्ठावान खऱ्या अर्थाने स्वतः तन मन धनाने स्वतःला पक्ष कार्यात झोकून देत आहे पण त्यांच्या कामाचा `आलेख“ वाढल्याने त्यांना जाणून बुजून बाहेर सारण्याचा प्रकार जिल्ह्यात घडत असून असाच काहीसा प्रकार काल- परवा जिल्ह्यात झालेल्या युवा सेनेचे फेरबदलावरून बघायला मिळाले . वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात झालेला फेरबदल चर्चेचा विषय ठरत आहे . या क्षेत्रातही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन अनेक युवकांनी वर्षभरापूर्वी युवा सेनेत प्रवेश केला होता . या नवयुकांनी तालुक्यात अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले एवढेच काय तर स्थानिक निवडणुकांमध्ये मेहनत घेऊन पद हि हासील केले . मात्र खुर्च्या मोडीत बसणाऱ्या व सोशलमिडीयावर स्टार असणाऱ्या काही चमको युवा सेने पदाधिकाऱ्यांना त्यांचे हे कार्य खटकले आणि पक्षांतरंगात मतभेदाला सुरवात झाली. नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना हळूहळू पक्षकार्यात बोलाविणे , बैठकीची सूचना न देणे अशा विषयाला सुरवात झाली. व वॉर्डात सध्या नागसेववकाच्या निवडणुकीत निवडून न येणारे स्वघोषित नेते पदावर बसले आणि खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलल्याने . युवा सेनेत नाराजी नाट्याला सुरवात झाली आहे. आता हे नाराजी शमते की भडका घेते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here