Home वरोरा दणका :- वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड पुन्हा गोत्यात ? माहिती आयोगाचा दंड.

दणका :- वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड पुन्हा गोत्यात ? माहिती आयोगाचा दंड.

वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा माहितीचा अधिकार कायद्यान्वये माहिती दिली नसल्याने कारवाईची टांगती तलवार ? राठोड सुट्टीवर ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड हे रुजू झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच वादात असल्याचे चित्र वर्तमानपत्रातील बातम्यातून समोर येत आहे दरम्यान त्यांच्या कार्यालयात प्रहार सेवक किशोर डुकरे यांनी दिनांक १८.०६.२०२१ रोजी माहितीचा अर्ज सादर केला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना माहिती ना दिल्यामुळे राज्य माहिती आयोग यांच्याकडून त्यांच्यावरव त्यांच्या संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांवर २०००/-रुपयांचा दंड आकारण्यात आल्याने त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे कारवाई च्या भीतीने त्यांनी सुट्टीचा अर्ज केल्याची चर्चा आहे.

किशोर डुकरे यांनी टेमुर्डा सर्कलमध्ये येणा-या वन समितीच्या रोख लेख्याच्या मुळ प्रतीची सत्यप्रत, २०१८-२०२० या कालावधीत प्राप्त पैसे व झालेल्या कामावरील खर्च यांची सत्यप्रतीची माहिती आणि सन २०१८ ते २०२० या कालावधीत कामावर असलेल्या वन मजुरांच्या हजेरी बुकाची सत्यप्रत मिळण्यात यावी व त्यांत मजुराला देण्यात आलेल्या मजुरीचे कॅश व्हाउचर उपलब्ध करून देण्यात यावे.” याबाबत माहिती मागितलेली होती. सदर माहिती अर्जावर जनमाहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांनी दि. ३०.०७.२०२१ रोजी मागणी केलेली माहिती क्षेत्र सहायक विजय उराडे टेमुर्डा यांचेकडून अप्राप्त आहे. क्षेत्र सहायक यांचे कडून माहिती प्राप्त होताच आपणास उपलब्ध करून देण्यात येईल असे अपिलार्थी किशोर डुकरे यांना कळविले व आपण माहिती देऊ शकत नाही असे एकूण त्यांच्या वागण्यावरून दिसून आल्याने किशोर डुकरे यांनी दिनांक २३.०७.२०२१ रोजी कलम १९ (१) नुसार प्रथम अपीलीय अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांचेकडे मागितलेली माहिती न दिल्यामुळे” असे कारण नमुद करुन प्रथम अपील दाखल केले. परंतु त्यावर प्रथम अपिलीय अधिकारी राठोड यांनी सुनावणी घेवून आदेश पारित केले नाही यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होतं आहे.

आता वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्या कडून माहिती लपवून ठेवल्याने किशोर डुकरे यांनी राज्य माहिती आयोगाकडे धाव घेतली त्यात त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १९(३) दिनांक २६.११.२०२१ रोजी “दिशाभूल करणारे उत्तर दिल्याने आपण द्वितीय अपील दाखल केले आहे असे अर्जात नमूद केले, या व्दितीय अपीलावर दिनांक १०.१०.२०२२ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती या सनावणी दरम्यान अपिलार्थी किशोर मधकर डकरे उपस्थित होते. जनमाहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, वरोरा एच. पी. शंडे उपस्थित होते. पण प्रथम अपिलीय अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड अनुपस्थित आहेत.

दरम्यान सादर कागदपत्राचे अवलोकन व उपस्थितांचे युक्तिवाद विचारात घेता, अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या माहिती अर्जानुषंगाने तत्कालिन जनमाहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी दि. ३०.०७.२०२१ रोजी माहिती क्षेत्र सहायक विजय उराडे टेमुर्डा यांचेकडून अप्राप्त असल्याचे नमूद केले होते व क्षेत्र सहायक टेमुर्डा यांचेकडून माहिती प्राप्त होताच आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात येईल असे अपिलार्थीस कळविण्यात आले पण प्रत्यक्षात जेंव्हा राठोड हे स्वतः अपिलीय अधिकारी म्हणून कर्तव्यास होते तेंव्हा त्यांनी ही माहिती स्वतःचा अधिकार वापरून कां दिली नाही हा मोठा प्रश्न असून आयोगाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर २ हजार रुपयांचा दंड थोपटला आहे. शिवाय सदर मागितलेली माहिती तात्काळ देण्याचे आदेश दिले आहे.

काय झाला माहिती आयोगाचा निर्णय ?

जनमाहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र यांनी दि. २२,०७,२०२१ रोजी सादर पत्रानुषंगाने अपिलार्थीस तात्काळ माहिती प्रदान करणे अपेक्षित आहे. सबब, अपीलार्थी यांना शारिरीक / मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे ते नुकसान भरपाईस पात्र ठरतात. संबंधीत प्राधिकरण वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा ता. वरोरा, जि.चंद्रपूर यांनी सदर आदेश मिळाल्यापासून १५ दिवसात कलम १९ (८) (ख) अन्वये २,०००/ रु. जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून वसूल करून नुकसान भरपाई अपिलार्थीस धनादेशाद्वारे अदा करावी व त्याची पोहच आयोगास सादर करावी, या आदेशासह प्रस्तुत द्वितीय अपील अर्ज निकाली काढण्यात येत आहे असे माहिती आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here