जुगार खेळतानाचा विडियो व्हायरल झाल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे कारवाई करणार का?
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर पोलिसांना आता कामधंदे उरले नाहीत का ? असा प्रश्न निर्माण होतं असून जिल्ह्याच्या राजुरा पोलीस स्टेशन मधे चक्क तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनीच जुगार भरवला असल्याची माहिती व्हायरल विडियो वरून समोर आली आहे अर्थात सगळे कामधंदे सोडून पोलिसांना जुगार खेळण्यासाठी कसा वेळ मिळतो याबद्दल आश्चर्य व्यक्त होतं असून या घटनेने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हायरल विडियो मधे चार पोलीस शिपाई जुगार खेळताना दिसत आहेत. खरं तर जुगारांना पकडण्याचं काम असताना जर पोलीसच जुगार खेळत असेल तर पोलिसांना कोण पकडणार? हा प्रश्न उभा ठाकला आहे. आपले कर्तव्य विसरून पोलिस थेट स्टेशनमध्ये जुगार खेळत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे हे गेल्या 5 दिवसा पासून जिल्ह्यात आहेत व ते 2 दिवसा आधीच या पोलीस स्टेशनमध्ये तपासणी साठी जाऊन आले आहेत त्यामुळे व्हायरल विडियो मधे दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे कारवाई करणार का ? असा प्रश्न जनतेतूनविचारला जातं असून पोलिसांच्या या अफलातून वागण्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे.