Home चंद्रपूर हनी ट्रॅप मधे अडकलेला तो वैद्यकीय विभागातील अधिकारी कोण ?

हनी ट्रॅप मधे अडकलेला तो वैद्यकीय विभागातील अधिकारी कोण ?

अश्लील चित्रफीत तयार करून ब्लॅकमेल करणाऱ्या झिबल भारसाखरे, सादिक पठाणला न्यायालयाने जामीन का नाकारला?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूरातील एका उच्च पदस्त आंबटशौकीन वैद्यकीय अधिकाऱ्याला हनी ट्रॅप मधे अडकवून त्यांच्याकडून तब्बल 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या झिबल भारसाखरे व सादिक पठाणला काल न्यायालयानं जामीन नाकारला असल्याने या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणखी काय उलगडा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान तो वैद्यकीय अधिकारी कोण आहे याबद्दल तर्कवितर्कलावल्या जातं आहे.

आरोपी झिबल भारसाखरे यांनी तीन महिलांच्या मदतीने उच्च पदस्थ असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला हनी ट्रॅप च्या जाळ्यात ओढून त्याची अश्लील चित्रफीत तयार केली व ब्लॅकमेल करण्यात आले आणि तब्बल 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना रंगेहाथ अटक करण्यात केली तर अन्य तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्याच्या आधीच्या सवयी बघता हा अधिकारी अगदी सहजपणे जाळ्यात अडकला. यापूर्वी याच अधिकाऱ्याला कार्यालयात अश्लील व्हिडीओ बघताना आढळल्याने निलंबित करण्यात आले होते अशी माहिती आहे.

कसा रचला हनी ट्रॅप ?

चंद्रपूर शहरातील भानापेठ येथील आरोपी झिबल भारसाखरे याचा वैद्यकीय विभागातील बड्या अधिकाऱ्याशी चांगला परिचय होता. जवळपास पन्नाशी पार केलेला हा अधिकारी आंबट शौकीन असल्याचे त्याला माहितचं होते. त्यामुळे हा अधिकारी सहज जाळ्यात येऊ शकतो आणि ब्लॅकमेल करून त्याच्याकडून मोठी खंडणी मागू शकतो असे त्याने ठरवले व सहा महिन्यांपूर्वी आरोपी झिबल भारसाखरे याने या अधिकाऱ्याला ओळखीची असलेल्या महिलेच्या घरी बोलावले. या महिलेने या अधिकाऱ्याला सांगितले की, एक महिलेला आपण खूप आवडता आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. त्यामुळे हा अधिकारी आणखी आतुर झाला. या महिलेला बोलाविण्यात आले. यानंतर अधिकाऱ्याला आपण खासगी चर्चा करण्यासाठी आतल्या खोलीत जावा असे सांगितले. आता सर्व प्रकार रेकॉर्ड करणारे कॅमेरे आधीच लागले होते, मात्र आधीच कामातुर झालेल्या बड्या अधिकाऱ्याला याची जराही भनक लागली नाही. यानंतर त्यांच्यात जे शारीरिक संबंध झाले ते सर्व रेकॉर्ड करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेने थेट या अधिकाऱ्याला फोन करत काल जे आपल्यात झाले ते त्याची सर्व चित्रफीत आणि फोटो आपल्याकडे असल्याचे सांगत आठ लाखांची खंडणी मागितली. यानंतर घाबरलेल्या बड्या अधिकाऱ्याने आरोपी झिबल भारसाखरे याला फोन करत आपल्याला महिला ब्लॅकमेल करीत असल्याचे सांगितले. आधीच सापळा रचण्यात आलेल्या या जाळ्यात डॉक्टर अलगत फसला होता. झिबलने आपण मध्यस्थी करतो असे सांगत तीन लाखांत हा सौदा केला. सर्व व्हिडीओ आणि फोटो डिलीट केले असे सांगण्यात आले, अधिकारी निश्चिंत झाला. मात्र, 24 नोव्हेंबरला एका अनोळखी नंबरवरून या अधिकाऱ्याला कॉल आला. आपल्याकडे तुमची अश्लिल चित्रफीत आणि फोटो असून ते आपण व्हायरल करणार आहो, जर करायचे नसेल तर 50 लाख द्या अशी मागणी त्याने केली. यानंतर हतबल झालेल्या या अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून सादिक खान या आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली. अन्य तीन महिला देखील यात सामील आहेत. त्यांच्या विरोधात भादवी कलम 384, 385 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, मंगेश भोयर, संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे आदिंनी केली.

आंबटशौकीन असलेल्या या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते?

आंबटशौकीन असलेल्या या वैद्यकीय अधिकाऱ्याला सात वर्षांपूर्वी याच आंबटशौकापायी निलंबित व्हावे लागले. त्यांच्या वैद्यकीय कार्यालयात सातत्याने इंटरनेटची बिल भरमसाठ येत असल्याने वैद्यकीय विभागाने चौकशी नेमली होती. यात हाच अधिकारी आपल्या कम्प्युटरमधून ‘पॉर्न साईट’ बघत असल्याचे समोर आले. त्यामुळे या अधिकाऱ्याला घरी बसावे लागले होते.

Previous articleधक्कादायक ;- चक्क पोलीस स्टेशनमधेचं भरवला पोलीस कर्मचाऱ्यांनी जुगार?
Next articleअखेर भ्रष्ट व मुजोर वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड निलंबित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here