Home चंद्रपूर अखेर भ्रष्ट व मुजोर वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड निलंबित.

अखेर भ्रष्ट व मुजोर वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड निलंबित.

वनरक्षक संदिप दादाजी वाटेकर, यांना जीवे मारण्याची धमकी भोवली ? भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलने चालवली होती क्रमशः बातमी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी एम पी राठोड यांच्या भ्रष्ट व मुजोरपणामुळे त्यांचे अधिनस्त असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणांत त्रस्त होते, अशातच संदिप दादाजी वाटेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने व त्यांनी दिनांक 17/09/2022 रोजी मुख्य वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती, शिवाय या प्रकरणी वनरक्षक व वनपाल संघटनेनेच्या माध्यमातून मुख्य वनसंरक्षक यांसह वनविभागाचे आयुक्त , सचिव यांना निवेदने देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता त्याची दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक लोणकर यांनी आज दिनांक 3/12/2022 ला वनपरिक्षेत्र अधिकारी एम पी राठोड यांचे निलंबन केले आहे. या निर्णयामुळे वरोरा वनपरिक्षेत्रातील सगळ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होतं आहे.

वनरक्षक व वनपाल संघटना, महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना यांच्या माध्यमातून एम.पी. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा (प्रा.), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांच्या विरुध्द तक्रारी केल्याने  त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही शुरु होती. वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा (प्रा.) राठोड यांच्या कार्यरत राहल्याने विभागाचे शिस्त व शासकिय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात आल्याने मुख्य वनसंरक्षक लोणकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 4 च्या पोटनियम (एक) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन एम.पी. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा (प्रा.) यांना सदर आदेश निर्गमित केलेल्या तारखेपासून शासकिय सेवेतून निलंबित करण्यांत येत असल्याचा आदेश केला आहे.

या आदेशात पुन्हा नमूद करण्यात आले की, हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधी पर्यंत एम.पी. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा (प्रा.) यांचे मुख्यालय चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर येथे राहील आणि उक्त एम.पी. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा (प्रा.) यांना विभागीय वनअधिकारी चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here