Home भद्रावती भद्रावती शहरात मनसेच्या पक्ष बांधणीला सुरुवात, युगल ठेंगे नवे शहर अध्यक्ष.

भद्रावती शहरात मनसेच्या पक्ष बांधणीला सुरुवात, युगल ठेंगे नवे शहर अध्यक्ष.

तालुका अध्यक्षासह जिल्हापरिषद व पंचायत समिती क्षेत्र निहाय पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या.

भद्रावती प्रतिनिधी :-

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ट नेते रमेश राजूरकर, राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या प्रयत्नांनी पक्ष संघटन मजबूत करून येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे, दरम्यान भद्रावती शहर व तालुक्यात मनसेचे पदाधिकारी पक्षवाढीसाठी काम करीत नसल्याने व पक्षात तेच ते चेहरे दिसत असल्याने नवीन कार्यकर्ते पक्षाशी जुळत नव्हते त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष संघटन वाढविण्याचा विचार पक्षाच्या वरिष्ठांनी घेतल्याने भद्रावती शहरात तरुण युवकांना घेऊन पक्षात प्रवेश करणारे युवा कार्यकर्ते युगल ठेंगे यांची भद्रावती शहराच्या अध्यक्ष पदी नियुक्ती नुकतिच जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी हॉटेल सनी पॉइंट येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात केली. यावेळी मनसे जेष्ट नेते रमेश राजूरकर जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश झाला. पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनसेचा दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.

युगल ठेंगे यांच्या नियुक्तीनंतर भद्रावती शहरात वार्ड निहाय शाखा बांधणीला सुरुवात होणार असल्याची प्रतिक्रिया स्वतः युगल ठेंगे यांनी दिली असल्याने भद्रावती शहरात लवकरच मनसेचे मोठे संघटन बघावयास मिळणार असल्याचं मत जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या भाषणात व्यक्त केले. शहराची पक्ष बांधणी सुरू असताना ग्रामीण क्षेत्रात सुद्धा पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय पद नियुक्त्या लवकरच केल्या जाईल अशी माहिती जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

भद्रावती शहर व तालुक्यात पक्षाच्या अंगीकृत संघटनांचे जाळे पण विणणार.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एक राजकीय पक्ष आहे ज्या पक्षात जातं पात पाहल्या जातं नसून इथे सर्वांगीण विकासाचे धोरण लक्षात घेता महिला सेना, विद्यार्थी सेना. जनहित विधी कक्ष विभाग. वाहतूक सेना, रोजगार स्वयंरोजगार विभाग, रस्ते आस्थापना. सहकार विभाग, शेतकरी सेना व चित्रपट सेना अशा प्रकारचे विविध विभाग आहेत या सर्व विभागांचे जाळे शहर व तालुक्यात नवीन कार्यकर्त्यांना पदे देऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचं धोरण राबविण्यात येणार असल्याने येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकीत मनसेला मोठे यश मिळणार असल्याचे बोलल्या जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here