Home चंद्रपूर सनसनिखेज ! चंद्रपूर शहरात ड्रगच्या च्या नादी लागून विद्यार्थी व तरुणांचे भविष्य...

सनसनिखेज ! चंद्रपूर शहरात ड्रगच्या च्या नादी लागून विद्यार्थी व तरुणांचे भविष्य बिघडणार.?

चंद्रपूर शहरात त्या ड्रग माफियांचे गुंडाराज? कोण आहेत ते ड्रग माफियां?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणांत अवैध धंद्यांना स्थानिक राजकारणी यांचा छुपा पाठिंबा असल्याचे चित्र दिसत असून ड्रग सारखी जीवघेणी नशिली व अमली पदार्थाची विक्री केल्या जातं असल्याने विद्यार्थी व तरुणांचे जीवन उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाची याबाबत भूमिका संशयास्पद दिसत असली तरी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे अजून स्पष्ट झाले नाही, यावरून ते फक्त निवडणुकीत मत मागणे आणि राष्ट्रीय सण आणि थोर पुरुषांच्या जयंती प्रित्यर्थ जनतेला शुभेच्छा देण्यासाठीच निवडून येतात का? हा प्रश्न गंभीरतेने विचारला जातं आहे. मात्र या गंभीर प्रकरणाची वाच्यता प्रसारमाध्यमांत करणाऱ्या पत्रकारांवर जीवघेणे हल्ले संबंधीत ड्रग तस्कर खुलेआम करीत असल्याने सामाजिक आरोग्यास मोठा धोका निर्माण झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात एम डी व कोकिन सारखी घातक नशिल्या पदार्थांची विक्री नागपूर येथील तस्कर सागर शाहू उर्फ लख्खु व बंटी शुक्ला स्थानिक विशाल पंजाबी यांच्या माध्यमातून करीत असल्याचा सनसनिखेज खुलासा यू ट्यूब चैनेल चे संपादक तनशिल पठाण यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केला, दरम्यान हे ड्रग तस्कर विद्यार्थी व तरुणांचे जीवन उध्वस्त करीत असल्याने या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेऊन त्यांच्यावर तात्काळ मोठी कारवाई करणे अपेक्षित असताना तब्बल रामनगर पोलीस स्टेशन मधे या प्रकरणी दोन दोन एफआयआर दाखल झाले असतांना पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने त्या ड्रग तस्करांमुळे तनशिल पठाण यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रपूर शहरातील तो विशाल पंजाबी कोण ?

चंद्रपूर शहरात झरना बार पडोली घुग्गुस रोडवर बेकायदेशीर कोळसा टॉल चालविणाऱ्या व जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री करण्यात पुढे असणाऱ्या विशाल पंजाबी यांचे पोलिसांशी चांगले संबंध असल्याने त्यांनी त्याचा फायदा घेऊन नागपूर येथील ड्रग तस्कर सागर शाहू उर्फ लख्खु व बंटी शुक्ला यांच्या माध्यमातून शहरात ड्रग विक्रीचे जाळे पसरविले असल्याची शंका आहे दरम्यान या ड्रग च्या अवैध विक्री बाबत तनशिल पठाण यांनी आपल्या हिंदुस्तान यू ट्यूब चैनेल वरून बातम्या प्रकाशित केल्यानंतर त्यांच्यावर झरना बार येथे हल्ला करण्याची घटना घडली शिवाय याबाबत माहिती देणाऱ्या हमदा वाहिद शेख याला विरजण स्थळी पळवून नेऊन त्याला जीवे मारण्याचा व त्यांचेकडून मीच स्वतः हा ड्रग व्यापार करत असल्याचा विडियो बनविण्यात त्यांचे सहकारी अमित गुप्ता अंकित ठाकूर मन्सुर सलमान रिजवान सिद्दीकी यांनी काढल्याची माहिती त्यांच्या तक्रारीवरून समोर आल्याने पोलिसांनी विशाल पंजाबी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून तनशिल पठाण यांच्यासह जेष्ट पत्रकार किशोर पोतनवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here