Home वरोरा राजकीय कट्टा :- भाजपच्या आलिशानने सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते परेशान ?

राजकीय कट्टा :- भाजपच्या आलिशानने सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते परेशान ?

एकाचे शिवसेनेत प्रस्थान तर बाकीचे भाजप कार्यकर्ते गुंडाळणार का बस्तान ? चर्चेला उधान.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात भाजपच्या एका आलिशानमुळे सगळेच परेशान असल्याने व त्यामुळे भाजप ला स्थानिक नेताच उरला नसल्याने सगळे माजी नगरसेवक सैराट झाले आहेत, तर काही पदाधिकारी संभ्रमात आहेत, दरम्यान नुकत्याच एका माजी भाजप नगरसेविकेच्या पतीने शिवसेनेत प्रवेश केल्याने व बाकी नगरसेवक सुद्धा इतर पक्षाची वाट धरत असल्याने भाजपचा वरोरा शहरात गाशा गुंडाळला जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

वरोरा तालुक्यात व शहरात भाजप ला कधीच चांगले दिवस नव्हते कारण इथे रुजली होती फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पण काँग्रेस चे संजय देवतळे ऐन विधनसभेच्या निवडणुकीत कोलांटउडी घेऊन भाजप मधे गेले आणि भाजप ला चांगले दिवस सुरू झाले, महत्वाची बाब म्हणजे वरोरा नगरपरिषदेत भाजपचा एक्का दुक्का नगरसेवक निवडून यायचा तिथे 2016 च्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला नगराध्यक्ष सह सत्ता आणता आली ही वस्तुस्थिती आहे. पण ज्या संजय देवतळे यांच्या पुण्याईने ऐहेतेशाम अली नगराध्यक्ष झाले तेच आता संजय देवतळे यांचा राजकीय वारसा चालविण्यात समर्थ नाहीत असे चित्र दिसत आहे, नव्हे आता सत्तेचा भोग भोगल्यानंतर व विकासाच्या नांवावर कमिशन च्या पोळ्या शेकल्यानंतर ते आपली वेगळी चूल तयार करण्यात मश्गुल असल्याच्या चर्चा आहे.

वरोरा नगरपरिषद मधे भाजप ची सत्ता पाच वर्ष होती व त्यांच्या सत्ताकाळात विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री असल्याने त्यांनी जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त निधी वरोरा नगरपरिषद ला दिला होता तत्कालीन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या नावाखाली आलिशान बांधले आणि आपली आलिशान राजकीय खेळी करत उर्वरित नगरसेवकांच्या हातात ढब्बु पण दिला नसल्याने नगरसेवक नाराज होतेचं पण ते बोलत नव्हते मात्र आता त्यांचा संयम सुटला असून माजी भाजप नगरसेविका टिपले यांचे पती किशोर टिपले यांचा काल शिवसेनेत प्रवेश झाला आणि पक्षाचे विघटन सुरू झाले असल्याचे चित्र उभे राहिले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here