Home चंद्रपूर व्यक्तिविशेष:- विजयी नेत्रुत्व करणारा लढवय्या नेता विजय वडेट्टीवार !

व्यक्तिविशेष:- विजयी नेत्रुत्व करणारा लढवय्या नेता विजय वडेट्टीवार !

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात काँग्रेस ची मुलुख मैदानी तोफ !

व्यक्तिविशेष :-

केवळ चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर विदर्भात काँग्रेस ची मुलुख मैदानी तोफ म्हणून प्रशिद्ध असणारा  विरोधकांना आव्हानं देणारा करारीपणा असणारा लढवय्या नेता म्हणून विजय वडेट्टीवारयांच्याकडे बघितल्या जाते.एवढेचनव्हे तर  महाराष्ट्राच्या राजकारणात विजयी नेतृत्व करणारा नेता म्हणून विजय वडेट्टीवार यांचा अग्रक्रम लागतो. एकीकडे भाजप ची लाट आल्यानंतर व २०१४ – २०१९ पाच वर्षात राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत असतांना अतिशय संयमीरित्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका त्यांनी पार पाडीत चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात काँग्रेसला जीवंत ठेवण्यात त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. राज्यात काँग्रेसमधीलच बडे नेते भाजपाच्या वाटेवर असतांना पाच वर्षापासून कोमात गेलेल्या काँग्रेसला संजवणी मिळवून देण्यात वडेट्टीवार त्यावेळी यशस्वी ठरले होते. दरम्यान सन 2019 च्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आली आणि त्यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे कॅबिनेट मंत्री आले होते. मंत्रिपद मिळताच त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित दारूबंदी उठवून चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो तरुण बेरोजगार यांना रोजगार मिळवून दिला तर जिल्ह्यात आर्थिक मंदी दूर सारून बाजारपेठा फुलवल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे मुरब्बी राजकारणी व जिल्ह्यात काँग्रेस चे दबंगनेते म्हणून माजी खासदार नरेश पुगलिया यांची ओळख होती व  त्यांच्या संमती शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस मधे कुठलेही संघटनात्मक बदल किंव्हा मंत्रिपद मिळत नव्हते पण विजय वडेट्टीवार यांनी त्यांना सह देत स्वतःची अशी क्रेज तयार केली की काँगेस श्रेष्ठीना सुद्धा आता विजय वडेट्टीवार यांच्या सहमतीची गरज आहे कारण त्यांनी स्वतःच्या बळावर काँग्रेस लाजिल्हात बळकट करण्याचे यशस्वी काम केले हे कुणीहीविसरून चलनार नाही आणि म्हणूनच काँग्रेस चे कार्यकर्ते आज त्यांच्याकडे आपला हक्काचा नेता म्हणून पाहतात यातच त्यांच्या राजकीय यशाचं गमक मानल्या जाते.

आज दिनांक 12 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे व त्यांचे महाराष्ट्रातील असंख्य चाहते त्यांना शुभेच्छा देणार आहे त्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या साप्ताहिक व न्यूज पोर्टल भूमिपूत्राची हाक समूहातर्फे मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा !

विजय वडेट्टीवार यांची यशस्वी राजकीय कारर्कीद-

१९९६ – मध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष

१९९८ ते २००४ – विधान परिषदेचे सदस्य.

२००४ ते २००९ – आमदार चिमूर विधानसभा

२००८ ते २००९ – राज्यमंत्री, जलसंपदा, आदिवासी विकास, पर्यावरण वने

२००९ ते २०१४ – आमदार चिमूर विधानसभा

२००९ ते २०१० – राज्यमंत्री , जलसंपदा, उर्जा, वित्त व नियोजन सांसदीय कार्य

२०१४ ते २०१९ – आमदार ब्रम्हपुरी विधानसभ क्षेत्र तथा उपगटनेता काँग्रेस विधीमंडळ

२०१९ ऑक्टोंबर – गटनेता विधीमंडळ काँग्रेस तथा विरोधीपक्ष नेता

२०१९ – ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा आमदार व मंत्री

२०२० – बहुजन विकास , मदत व पुनर्वसन , आपत्ती व्यवस्थापन मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here