Home चंद्रपूर व्यक्तिविशेष:- विजयी नेत्रुत्व करणारा लढवय्या नेता विजय वडेट्टीवार !

व्यक्तिविशेष:- विजयी नेत्रुत्व करणारा लढवय्या नेता विजय वडेट्टीवार !

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात काँग्रेस ची मुलुख मैदानी तोफ !

व्यक्तिविशेष :-

देशातील आजचा राजकीय वर्तमान विद्वेषी, एकसुरी,वैरभाव जोपासणारा व विरोधकांचा उपमर्द करणार असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात विजय वडेट्टीवार यांचा रोखठोकपणा व विरोधकांना आव्हानं देणारा करारीपणा आजही राजकीय पटलावर प्रामुख्यानं प्रभावी ठरत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विजयी नेतृत्व करणारा नेता म्हणून विजय वडेट्टीवार यांच्याकडे पहिल्या जाते. एकीकडे भाजप ची लाट आल्यानंतर व २०१४ – २०१९ पाच वर्षात राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत असतांना अतिशय संयमीरित्या विरोधी पक्षनेत्याची भूमिका त्यांनी पार पाडीत चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात काँग्रेसला जीवंत ठेवण्यात त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. राज्यात काँग्रेसमधीलच बडे नेते भाजपाच्या वाटेवर असतांना पाच वर्षापासून कोमात गेलेल्या काँग्रेसला संजवणी मिळवून देण्यात वडेट्टीवार त्यावेळी यशस्वी ठरले होते. दरम्यान सन 2019 च्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आली आणि त्यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे कॅबिनेट मंत्री आले होते. मंत्रिपद मिळताच त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित दारूबंदी उठवून चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो तरुण बेरोजगार यांना रोजगार मिळवून दिला तर जिल्ह्यात आर्थिक मंदी दूर सारून बाजारपेठा फुलवल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नंतर काँग्रेस ला अखेरची घरघर लागली असताना विजय वडेट्टीवार यांच्या प्रभावी नेत्रुत्वात काँग्रेस ला नवसंजीवनी मिळाली आहे. आज त्यांच्याच प्रयत्नाने जिल्हात खासदार निवडून आणण्यातमोलाची भूमिका आहे हे कुणीही विसरून चालणार नाही. आज त्यांचा (दिनांक 12डिसेंबरला) वाढदिवस आहे आणि त्यांच्या लाखों चाहत्यांकडून त्यांना यशस्वी राजकारणी म्हणून शुभेच्छा येणार आहे आणि म्हणूनच भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल समूहाकडे सुद्धा विजय वडेट्टीवार यांच्या यशस्वी वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा !

विजय वडेट्टीवार यांची यशस्वी राजकीय कारर्कीद-

१९९६ – मध्ये वनविकास महामंडळाचे अध्यक्ष

१९९८ ते २००४ – विधान परिषदेचे सदस्य.

२००४ ते २००९ – आमदार चिमूर विधानसभा

२००८ ते २००९ – राज्यमंत्री, जलसंपदा, आदिवासी विकास, पर्यावरण वने

२००९ ते २०१४ – आमदार चिमूर विधानसभा

२००९ ते २०१० – राज्यमंत्री , जलसंपदा, उर्जा, वित्त व नियोजन सांसदीय कार्य

२०१४ ते २०१९ – आमदार ब्रम्हपुरी विधानसभ क्षेत्र तथा उपगटनेता काँग्रेस विधीमंडळ

२०१९ ऑक्टोंबर – गटनेता विधीमंडळ काँग्रेस तथा विरोधीपक्ष नेता

२०१९ – ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा आमदार व मंत्री

२०२० – बहुजन विकास , मदत व पुनर्वसन , आपत्ती व्यवस्थापन मंत्री

Previous articleग्रामरोजगार सेवक व  मनरेगा कर्मचारी संघटचे नाशिक येथे अधिवेशन.
Next articleव्यक्तिविशेष:- विजयी नेत्रुत्व करणारा लढवय्या नेता विजय वडेट्टीवार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here