Home महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक व  मनरेगा कर्मचारी संघटचे नाशिक येथे अधिवेशन.

ग्रामरोजगार सेवक व  मनरेगा कर्मचारी संघटचे नाशिक येथे अधिवेशन.

विविध मागण्यासह पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार.आयोजकांची माहिती.

सोमवर दि.12 डिसेंबर :-

आज सोमवारी सकाळी 10 वाजता नाशिक आण्णा भाऊ साठे सभागृह सिन्नर येथे ग्रामरोजगार सेवक व  मनरेगा कर्मचारी संघटचे येथे अधिवेशन आयोजितकेल्याची माहिती संघटनेचे नाशिक  जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम, जिल्हा सचिव अनिल बुचकुल, तालुकाध्यक्ष मनोहर आंधळे यांनीदिली आहे. या अधिवेशनाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होत आहे.आमदार माणिकराव कोकाटे,माजी आमदार राजाभाऊ वाजे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उदय सांगळे, जिल्हाधिकारी डी गंगाथरण, मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, कामगार आयुक्त विकास माळी,नरेगाच्या उपायुक्त प्रज्ञा बडे, उपजिल्हाधिकारी नितीन कुमार मुंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे,नरेगाचे उपविभागीय अधिकारी संजय सुर्यवंशी, तहसीलदार एकनाथ बंगाळे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, वनपरिक्षेत्र मनिषा जाधव, जिल्हा रेशीम अधिकारी सारंग सोरते, निलेश पाटील, सहायक गटविकास अधिकारी नयन पाटील, सुखदेव चित्ते, नंदकुमार अहिरे, रविकांत पवार, व्हि.डी.धनवटे, सखाराम दुगेंडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास वाकचौरे, तालुका अध्यक्ष संजय गिरी.आदी मान्यवर या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे राज्यध्यक्ष काॅम्रेड राजु देसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे.सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी या जिल्हा अधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सिन्नर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या अधिवेशनात ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्याचा ठराव संमत होणार.

आयसीडीएसच्या धर्तीवर मनरेगा कक्ष स्थापन करावा, ग्राम रोजगार सेवक व मनरेगा कर्मचारी यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, ग्राम रोजगार सेवकांना इतर राज्यांप्रमाणे 15 हजार रुपये वेतन द्यावे, जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने नेमणूक पत्र मिळाले,शेतबांधावरील सर्व कामे रोहयो मध्ये समाविष्ट करावे, संपूर्ण जिल्ह्यात पोखरा योजना लागू करावी,या मागण्यांचा समावेश आहे.

ग्रामरोजगार सेवक मनरेगा कर्मचारी संघटना नाशिक जिल्हा 4थे जिल्हा अधिवेशन सिन्नर येथे कोणते होणार ठराव

1 ग्रामरोजगार सेवकांना दरमहा निश्चित9000/-रू व प्रोत्साहन भत्ता दया
2 ग्रामरोजगार सेवक व मनरेगा कर्मचाऱ्यांना किमान वेतन सामाजिक सुरक्षा दया
3 मनरेगा मजुराला दररोज 350रू मजूरी.मिळालीच पाहिजे
4 शेतकऱ्यांच्या बांधावरच्या कामाचा समावेश रोजगार हामी कादयात करावा
5 ग्रामरोजगार सेवकांचा सन्मान दरवर्षी जिल्हा परिषदने आदर्श ग्रामरोजगार सेवकांचा करावा.

Previous articleधक्कादायक :- सावली परिसरात आंतरराज्य रेती तस्कर सक्रिय ?
Next articleव्यक्तिविशेष:- विजयी नेत्रुत्व करणारा लढवय्या नेता विजय वडेट्टीवार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here