Home चंद्रपूर खळबळजनक :- पुन्हा राजू रेड्डी (यशराज) नॉट फॉर रिसेल सिमेंट चोरी प्रकरणात...

खळबळजनक :- पुन्हा राजू रेड्डी (यशराज) नॉट फॉर रिसेल सिमेंट चोरी प्रकरणात ?

घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यालगत सुरू असलेल्या नवीन बांधकाम ठिकाणी सिमेंट बैगा आढळल्याने उडाली खळबळ.

घुग्गुस प्रतिनिधी :-

घुग्गुस परिसरात असलेल्या एसीसी सिमेंट कंपनीत नेहमीच सावळा गोंधळ असून येथील अधिकारी यांची कंत्राटदार यांच्याशी अर्थपूर्ण युती आघाडी असल्याने नॉट फॉर रिसेल नावाने छापील सिमेंट बैगा नेहमीच चोरी होतं असल्याने व या संदर्भात तेथील कंत्राटदार राजू रेड्डी यांच्या यशराज नावाच्याच सिमेंट बैगा सापडत असल्याने राजू रेड्डी यांना काळ्या यादीत टाकून त्यांचे कंत्राट बंद का होतं नाही ? असा सवाल आता विचारल्या जातं आहे.

एसीसी सिमेंट कंपनीतून सन २०१८ ला कंत्राटदार राजू रेड्डी यांनी खुल्या बाजारात नॉट फॉर रिसेल सिमेंट च्या बैगा विकल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन अटक करण्यात आली होती व या प्रकरणी एसीसी सिमेंट कंपनीच्या कारभाराची सिआयडी चौकशी झाली होती, दरम्यान कंपनीच्या मुख्य संचालकांनी या प्रकरणी कंपनीचे नाव बदनाम होऊ नये म्हणून वरिष्ठ स्थरावर समझोता केला होता त्यामुळं हे प्रकरण थंडबस्त्यात गेले. या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर तालुक्यातील कोसारा येथे ‘नॉट फॉर रिसेल’ सिमेंटच्या १८ पिशव्या आढळून आल्या होत्या. त्या पिशव्या देखील राजू रेड्डी यांच्या यशराज नावाच्या कंत्राटी कंपनीच्या होत्या व या संदर्भात चंद्रपूर च्या रामनगर पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल झाली होती पण एसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा राजू रेड्डी यांना वाचविण्याचा प्रयत्न केलं होता.

आता परत यांचं सिमेंट चोरी प्रकरणाची पुनरावृत्ती होतं असून घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यालगत नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी शुक्रवार २३ डिसेंबर रोजी ‘नॉट फॉर रिसेल’ नमूद असलेल्या एसीसी सिमेंट कंपनीच्या ३ सिमेंट भरलेल्या व १८ रिकाम्या पिशव्या आढळून आल्याने व त्या सिमेंट बैगा राजू रेड्डी यांच्या यशराज नावांच्या कंपनीला मिळाल्या असल्याचे नमूद असल्याने घुग्गुस शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पिशव्या जप्त करून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी करा.

काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर तालुक्यातील कोसारा येथे ‘नॉट फॉर रिसेल’ सिमेंटच्या १८ पिशव्या आढळून आल्या होत्या. त्या पिशव्या देखील यशराज नावाच्या असल्याने पोलिसांनी चौकशी करून एसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविले होते. मात्र अगोदरच राजू रेड्डी या कंत्राटदाराशी संगनमत असल्याने एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्या सिमेंट बैगा कुणाच्या आहे किंव्हा काय ? याबाबत संभ्रम निर्माण करणारे उत्तर पोलीस प्रशासनाला देऊन नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. आता तेच पुन्हा प्रकरण समोर आल्याने एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांचीचं पोलीस चौकशी करा अशी मागणी होतं आहे.

Previous articleब्रेकिंग :- मराठी चित्रपटाची शूटिंग वरोरा येथील बावणे मंगल कार्यालयात.
Next articleप्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत कंत्राटदारांकडून कामगारांची आर्थिक पिळवणूक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here