Home वरोरा ब्रेकिंग :- मराठी चित्रपटाची शूटिंग वरोरा येथील बावणे मंगल कार्यालयात.

ब्रेकिंग :- मराठी चित्रपटाची शूटिंग वरोरा येथील बावणे मंगल कार्यालयात.

धून प्रोड्युकॅशन निर्मित “स्थळ” या पारिवारिक चित्रपटात वर्हाडी होण्याची वरोरावासियांना संधी. चित्रपटात वरोरावासिय झळकणार 

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा या तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले व नामांकित वेब सीरिज व हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले जयंत सोमलकर यांच्या आगामी “स्थळ” हया चित्रपटाची शूटिंग सद्ध्या महाराष्ट्रात सुरू असून आपल्या जन्मगाव असलेल्या वरोरा व डोंगरगाव येथे या चित्रपटाची जास्तीत जास्त शूटिंग व्हावी असा दिग्दर्शक यांचा मानस असल्याने उद्या दिनांक 25 डिसेंबरला सकाळी 9.00 वाजेपासून स्थानिक बावणे मंगल कार्यालयात लग्नाच्या चित्रीकरणाचे द्रुश्य चित्रित होणार आहे, त्यामुळे वरोरा शहर व तालुक्यातील नागरिकांना या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी हजर राहून लग्नात वर्हाडी होण्याचा मान व चित्रपटात पडद्यावर झळकण्याची संधी मिळणार आहे.

धून प्रोड्युकॅशन निर्मिती संस्थे द्वारे होणाऱ्या जयंत सोमलकर लिखित आणि दिग्दर्शित “स्थळ” या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण वरोरा या भागात सुरू असून यातील लग्नाच्या प्रसंगांचे चित्रीकरण उद्या दि 25 डिसेंबर2022 रोजी बावणे मंगल कार्यालयात सकाळी 9.00 वाजेपासून सुरू होणार आहे करीता चित्रपटात आपले द्रुश्य येण्याची आवड असलेल्या नागरिकांनी यावे या चित्रपट शूटिंग दरम्यान सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली असल्याची माहिती आयोजकांकडून कळविण्यात आली आहे.

Previous articleखळबळजनक :- वनविभागाच्या जमिनीवर चक्क ले आऊट टाकून प्लॉटची विक्री.
Next articleखळबळजनक :- पुन्हा राजू रेड्डी (यशराज) नॉट फॉर रिसेल सिमेंट चोरी प्रकरणात ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here