Home गडचिरोली खळबळजनक :- वनविभागाच्या जमिनीवर चक्क ले आऊट टाकून प्लॉटची विक्री.

खळबळजनक :- वनविभागाच्या जमिनीवर चक्क ले आऊट टाकून प्लॉटची विक्री.

वनविभागाच्या पोलीस तक्रारीवरून गुन्हे दाखल पण आरोपी अजूनही मोकाटच?

गडचिरोली वार्ता :

शहरातील भूखंडमाफियांनी चक्क वनविभागाच्या जमिनीवर ले आऊट करून तेथील प्लॉट ची परस्पर विक्री केल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून या प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस तक्रार केली पण आरोपी अजूनही मोकाट असल्याने वनविभाग व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गडचिरोली शहारात आयटीआय गोकुळनगर मार्गावरील वनविभागाच्या सर्व्हे क्रमांक 21 वरील जवळपास 1.20 हेक्टर आर वर भूमाफियानी प्लॉट पाडल्याने स्थानिक पोलीस स्टेशन मनीष कन्नमवार, रुपेश सोनटक्के, नरेंद्र डोंबळे व हरीश बांबोळे यांच्या विरोधात वनविभागाने तकार दाखल केली होती व त्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहे, मात्र तहसीलदारांनी सदर वन जागेबाबत सात महिन्यांपूर्वीच वनविभागाला अहवाल दिल्यानंतरही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने तो अहवाल दडून ठेवल्याने वनविभागाचा या भूखंड माफियांसोबत सहभाग आहे का ? यांची पोलीस चौकशी होणे गरजेचे झाले आहे.

या वनविभागाच्या जागेवर ज्या पद्धतीने भूखंड माफियांनी अतिक्रमण करून प्लॉट पाडले व ते परस्पर विकले तशाच प्रकारचे प्रकरण सर्व्हे क्रमांक 100 ची चौकशी केल्यानंतर समोर येऊ शकते व या ठिकाणी 100 एकर पेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण झाल्याची चर्चा होतं आहे.

वनविभागाने आरोपीना वन कस्टडीत ठेवावे ?

वनकायद्यानुसार जर एखादा आरोपी वन विभागातील चोरी प्रकरणात सापडला तर त्यांना वन कस्टडीत ठेवल्या जाते तर मग वन जामीनच्या चोरी प्रकरणी आरोपींना वन कस्टडी का नाही हा प्रश्न विचारल्या जातं असून वन कायद्या अंतर्गत आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here