Home चंद्रपूर माजी नगरसेविकेचे पती रवि गुरनुले देतात अवैध धंद्यांना चालना.

माजी नगरसेविकेचे पती रवि गुरनुले देतात अवैध धंद्यांना चालना.

जागेच्या वादावरून आशा बडवाईक यांनी केली मनपा आयुक्तांकडे रवि गुरनुले यांची तक्रार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण झालेले आहे ते स्थानिक नगरसेवक यांच्याच संमतीने होतात अशी आजवरची माहिती आहे, शिवाय ज्या महिला नगरसेविका असतात त्या कारभार करत नाही तर त्यांचे पतीच कारभार करतात त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या पत्नीच्या अधिकाराचा फायदा घेत सामान्य नागरिकांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे कारस्थान नगरसेविकेचे पती करतात ही माहिती आता समोर येत आहे दरम्यान  तुकुम प्रभागात रवि गुरनुले हे आपल्या पत्नीच्या अधिकाराचा वापर करून व मनपा आयुक्त यांच्याकडे आपल्या समर्थकांकडून तक्रारी करायला लावून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकाम कामात अडथळा निर्माण करीत असल्याची बाब पुढे आली आहे. या  संदर्भात आशा बडवाईक यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करून रवि गुरनुले यांचे स्थानिक अवैध धंदे करणाऱ्या सोबत काय संबंध आहे याचा पाढाच वाचला आहे.

तुकुम प्रभागात अनेक समस्या आ-वासून उभ्या असताना व त्यापासून स्थानिक नागरिकांना त्रास होतं असताना त्या सोडविण्याचे सोडून नागरिकांच्या अंतर्गत कामात अडथळे निर्माण करण्याचे काम नगरसेविका पत्नीचे पती महोदय करतात ते खरं तर अशोभनीय आहे व आशा लोकांना भाजप सारख्या पक्षांनी येणाऱ्या निवडणुकांत उमेदवारी देऊ नये कारण जनतेचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचे असताना जनतेत भांडण लावणं हे जर नगरसेवक यांचा हेतू असेल तर मग असे नगरसेवक हवेच कशाला ? हा प्रश्न जनतेकडून विचारला जातं आहे.

रवि गुरनुले यांच्या प्रभागात अनेक अवैध व्यवसाय होतं असतात त्यात भंगार चोरी कोळसा चोरी प्रामुख्याने असून त्या अवैध व्यावसायिकांसोबत त्यांचे संबंध असल्यानेइतर नागरिकांना या अवैध व्यवसायाचा त्रास होतं असतांना त्यांचीच बाजू घेऊन माजी नगरसेविकेचे पती रवि गुरनुले देतात अवैध धंद्यांना चालना देतात व आम्हचे बांधकाम हे आम्हच्याचं जागेवर असतांना त्याबद्दल खोट्या तक्रारी देऊन आम्हांला नाहकत्रास देतात  असा आरोप या तुकुम प्रभागातील आशा बडवाईक यांनी केला आहे.

Previous articleब्रेकिंग :- विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचं दुःखद निधन.
Next articleधक्कादायक:-मुलीचे अपहरण झाल्याने एकाच कुटुंबातील सात जणांनी केली आत्महत्या ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here