Home महाराष्ट्र धक्कादायक:-मुलीचे अपहरण झाल्याने एकाच कुटुंबातील सात जणांनी केली आत्महत्या ?

धक्कादायक:-मुलीचे अपहरण झाल्याने एकाच कुटुंबातील सात जणांनी केली आत्महत्या ?

भीमा नदीत मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याने असा भयंकर प्रसंग आला समोर.

न्यूज नेटवर्क :-

आपल्या पोटच्या लेकिचे काही बरेवाईट झाले तर त्या कुटुंबावर काय परिणाम होतात यांचे चित्र न रेखाटलेलेचं बरे पण जेंव्हा ते दुःखद प्रसंग समोर येतात तेंव्हा मात्र समाजमन हळहळून जातं आणि मग दुःख व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच राहत नाही असाच एक दुःखद प्रसंग पुण्यात झाला असून मुलाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भीमा नदीत सोमवारी सकाळी पती, पत्नी, मुलगी, जावई आणि तीन मुलांचे मृतदेह आढळून आले.

ही दुःखद घटना पुण्यातील दौंडमध्ये घडली. या कुटुंबातील मुलीचे त्याच गावातील एका मुलाने अपहरण केल्याची माहिती समोर आली असल्याने या कुटुंबात कमालीचा संताप व मनस्ताप झाला आणि नैराश्यात त्या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या दु:खद घटनेने समाजात खळबळ उडाली आहे आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील आणि गुन्हेगाराला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन पुणे पोलिसांनी दिले आहे.

असा घटना जेंव्हा घडतात तेंव्हा खरं तर त्यांच्या कुटुंबाला व त्यातील व्यक्तींना मानसिक आधाराची आवश्यकता असते, अशा प्रसंगातून जातात कुटुंबातील सदस्यांना ताबडतोब मदत द्यायला हवी पण कधी कधी ते होतं नाही आणि मग कुटुंबातील व्यक्ति टोकांच्या भूमिका घेतात हे दुर्भाग्यपूर्ण आहे.

Previous articleमाजी नगरसेविकेचे पती रवि गुरनुले देतात अवैध धंद्यांना चालना.
Next articleकृषी वार्ता:- शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांतून यशस्वी ऊद्दोजक व्हावे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here