Home वरोरा कृषी वार्ता:- शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांतून यशस्वी ऊद्दोजक व्हावे,

कृषी वार्ता:- शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांतून यशस्वी ऊद्दोजक व्हावे,

कृषी विभागाच्या सभेत शेतकऱ्यांना स्मार्ट शेतकरी बनण्याचे आवाहन.

खाबाडा प्रतिनिधि
मनोहर खिरटकर

राज्यात कृषी विभागाला विविध योजना राबविण्याचे उद्दिष्ट असले तरी जोपर्यंत शेतकऱ्यांसोबत सवांद साधल्या जाणार नाही व योजना काय आहे हे पटवून देण्यात येणार नाही तोपर्यंत शेतकरी स्मार्ट शेतकरी म्हणून समोर येणार नाही व तो कधीही उद्दोजक होणार नाही आणि म्हणूनच वरोरा तालुक्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना एकत्र करून कृषी विभागाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांनी कृषकोन्नती कृषि विकास आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी टेमुर्डा ता वरोरा च्या वतीने आयोजित सभेत शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा फायदा घेऊन उद्दोजक होण्याचे आवाहन केले आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट )या योजने अंतर्गत दि 18 जानेवारी रोजी कृषकोन्नती कृषि विकास आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी टेमुर्डा ता वरोरा यांची कृषि विभागामार्फत सभा घेण्यात आली. कृषि अन्नप्रक्रिया करून उद्योजक होण्याचा संधी आणि फलोत्पादन मधून आर्थिक उन्नतीची वाट धरण्याकरिता कु. प्रगती चव्हाण मंडळ कृषि अधिकारी टेमुर्डा यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. कृषि विभागाच्या विविध योजना, राष्ट्रीय कृषि विकास कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून सुदृढ समाज निर्माण करण्याविषयी श्री लोखंडे कृषि पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले. सूक्ष्म सिंचन, कृषि यांत्रिकीकरण इत्यादि योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करण्याकरिता व महा डी बी टी पोर्टल वर अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याविषयी श्री डोंगरकार कृषि पर्यवेक्षक यांनी समंबोधन केले.

विविध पिक प्रात्यक्षिके, स्वयंरोजगार प्रशिक्षण इत्यादि विषयी कु मिनल आसेकर, बीटीएम यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. कृष्णकोन्नती चे संचालक श्री बंडू डाखरे यांनी स्मार्ट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन सर्वांनी एकत्रित येऊन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन उपस्थित सर्व सभासद व शेतकरी बंधूंना केले. सभेकरिता कृष्णकोन्नती चे अध्यक्ष श्री मरस्कोल्हे, सभेमध्ये कृषि विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती देण्यात आली सदर सभेस कु प्रगती चव्हाण मंडळ कृषि अधिकारी टेमूर्डा, पी एस लोखंडे कृषि परिमूरडा, के पी डोंगरकर कृषि पर्यवेक्षक टेमूर्डा 2 कु मीनल आसेकर BTM, यांनी midh, pmfme, pmksy, कृषि यांत्रिकीकरण, nfsm,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृण धान्य याचे महत्व सांगण्यात आले तसेच बंडू डाखरे fpo संचालक, जगदीश मरस्कोल्हे, श्री खापणे, तसेच सर्व संचालक व सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleधक्कादायक:-मुलीचे अपहरण झाल्याने एकाच कुटुंबातील सात जणांनी केली आत्महत्या ?
Next articleअखेर चंद्रपूर जिल्ह्यात बनावट देशी दारू अड्डय़ावर धाड. मुख्य आरोपी फरार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here