नशेच्या नादात यमदसनी पोहचविणाऱ्या बनावट दारू विक्रेत्यांचा पर्दाफाश.या धंद्याला राजकीय राजाश्रय असल्याची चर्चा.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठली असली तरी दारूबंदी च्या काळात बनावट दारू बनविणाऱ्या टोळीनी नवी शक्कल लढवत आपला व्यवसाय इतरत्र वळवला खरा पण शेवटी बनावट देशी दारूचा मूल तालुक्यातील चितेगाव येथील कारखानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाळ्यात सापडला, चितेगांव येथील ए व्हिजी गोट फार्मच्या पडद्याआड बनावट अवैध देशी दारूचा अड्डा सुरू होता तो राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून व सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करून उध्वस्त केला. सदर कारवाई बुधवारी सकाळच्या दरम्यान करण्यात आली असुन सदर कारवाईमुळे मूल तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यामध्ये खळबळ उडालीआहे. बनावट देशी विदेशी दारूमुळे अनेकांना लिव्हर प्रॉब्लेम होऊन त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यामुळं शरीराला घातक अशी रसायनं वापरून व कलरचा योग्य वापर करून बनावट दारू बनविण्याचा जो खेळ सुरू आहे त्यांवर या कारवाईमुळे मोठा वचक बसला आहे.
दारूबंदी उठवल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर्षी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे, दरम्यान चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी असतानाच मोठया प्रमाणावर अवै दारूविक्री सुरू होती, त्या अवैध दारू विक्रीला राजकीय नेत्यांचा राजाश्रय होता तसा आता सुद्धा बनावट दारू संदर्भात असू शकतो अशी चर्चा आहे
दरम्यान महाविकास आघाडी सरकाने चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदी उठविली, मात्र अवैध आणि बनावट दारूविक्री आजही मोठया प्रमाणावर सुरू आहे, मूल तालुक्यातील राज्य महामार्गावर चितेगांव येथील महाविद्यालयाला लागुन असलेल्या शेड मध्ये अवैध बनावटी दारू बनविण्याचे काम सुरू होते, सदर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहित होताच बुधवारी सकाळी धाड टाकुन सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याठिकाणाहून रॉकेट देशी दारू प्रवरा डिस्टिलरी अहमनगरच्या नावाने असलेले कागदी खोके सुद्धा जप्त करण्यात आले.
काही विदेशी दारू सुद्धा बनावट असल्याची अनेकांची शंका ?
ज्या प्रकारे बनावट देशी दारू बनविण्याचा गोरखधंदा सुरू होता तसा विदेशी दारूचा अड्डा सुद्धा जिल्ह्यात असू शकतो कारण ज्या पद्धतीने काही विदेशी दारूची सुगंध ही वेगवेगळी येते त्यामुळं बनावट विदेशी दारू बनविण्याचा कारखाना कुठेतरी असावा अशी शंका मद्यशौकिन व्यक्त करत आहे. आता विदेशी बनावट दारूचा अड्डा सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभाग उध्वस्त करणार कां ? याकडे सर्व मद्य प्रेमींचे लक्ष लागलेले आहे.