Home भद्रावती धक्कादायक ;- भद्रावती नगरपालिकेत नगरसेवकांचा पगार कामाच्या टक्केवारीतून? नगरसेवकच बनले ठेकेदार?

धक्कादायक ;- भद्रावती नगरपालिकेत नगरसेवकांचा पगार कामाच्या टक्केवारीतून? नगरसेवकच बनले ठेकेदार?

चक्क घुटकाळा प्रभागाचे नगरसेवक विनोद वानखेडे यांनीच सांगितला ऑखोदेखा हाल? व्हायरल विडियो वरून नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची पोलखोल ?

भद्रावती :-

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेत ज्या शिवसेनेची सत्ता आहे (अर्थात आता ती काँग्रेसची झाली) त्या नगरपरिषद मधे मागील अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार होतोय असा आरोप होतं होता, मात्र प्रत्यक्षात याबाबत समोर येऊन कुणी बिनधास्तपणे वाचा फोडली नव्हती पण आता तत्कालीन शिवसेनेचे विद्यमान(काँग्रेसचे) घुटकाळा प्रभागाचे नगरसेवक विनोद वानखेडे यांनीच याबाबत ऑखोदेखाहाल समोर आणला असून नगरपरिषदच्या विकास कामातून टक्केवारी घेऊन नगरसेवकांना महिन्यांचा 6000/- रुपये पगार व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या 10% कमिशन सह नगरपरिषद मुख्याधिकारी 3% कमिशन, अभियंता गुप्ता 3% कमिशन, आबू-बाबू 1% कमिशन तथा ज्या ठेकेदाराच्या नावावर काम आहे त्याचे 3% कमिशन असे एकूण 20% कमिशन ठेकेदार वाटप करतात असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. या सार्वजनिक खुलाशाने भद्रावतीकरांच्या करातून येथील नगरपरिषदचे सत्ताधारी व अधिकारी कशी लूट करताहेत हे समोर आल्याने व स्वतः नगरसेवकच बेकायदेशीर ठेकेदारी करीत असल्याने भद्रावती शहरातील  जनतेत मोठा संताप व्यक्त होतं आहे.

नगरपरिषदची २०१८ मधे थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाली व नगराध्यक्ष म्हणून अनिल धानोरकर यांना जनतेने निवडून दिले पण आता शहराच्या विकास कामातून ते सरळ १० टक्के कमिशन खात असल्याची व नगरसेवकांना 6000/- रुपये पगार नगरपरिषद कडून दिल्या जात असल्याची माहिती चक्क त्यांचेच नगरसेवक विनोद वानखडे यांनीच एका माजी नगरसेवकाला दिल्याने  या नगरपरिषद मधे आतापर्यंत झालेला भ्रष्टाचार आता समोर आला आहे. दरम्यान ही बाब व्हाट्सअप वरून सगळीकडे माहिती होतं असून राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पाच वर्षात नगरसेवकांना ६० लाखांचे वाटप ?

सत्तेेत असलेले नगरसेवक आपल्या विरोधात बोलू नये तथा आपल्या सर्व वैध-अवैध कामांना मुक संमती मिळावी, करीता नगराध्यक्षांतर्फे जवळपास १५ ते १७ नगरसेवकांना प्रत्येकी रु. ६०००/- (सहा हजार रु.) महिना दिल्या जात आहे. याचे सरासरी गोळाबेरीज केल्यास लक्षात येते की, जवळपास रू. १,००,०००/- (एक लाख रु.) महिना, वर्षाचे रु. १२,००,०००/- (बारा लाख रु.) तर पाच वर्षाचे रु. ६०,००,०००/- (साठ लाख रु.) वाटल्या जात आहे. म्हणजे नगराध्यक्ष स्वतः पाच वर्षात किती पैसे कमवित असेल, याचा अंदाज येतो. यावरून  ही सर्व माया कमिशनखोरी, टक्केवारी, भ्रष्टाचार, वाढीव टेंडर रक्कम, व लुटीच्या मार्गातून गोळा होते हे स्पष्ट आहे.

Previous articleस्तुत्य उपक्रम :- कर्जमाफी, अतिवृष्टीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसेचे नोंदणी अभियान.
Next articleचिंताजनक:- महाराष्ट्र राज्यात लागली भ्रष्टाचाराची वाळवी,अण्णा हजारे मात्र निद्रिस्त ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here