Home महाराष्ट्र चिंताजनक:- महाराष्ट्र राज्यात लागली भ्रष्टाचाराची वाळवी,अण्णा हजारे मात्र निद्रिस्त ?

चिंताजनक:- महाराष्ट्र राज्यात लागली भ्रष्टाचाराची वाळवी,अण्णा हजारे मात्र निद्रिस्त ?

भ्रष्टाचाराविरोधात अवघ्या देशाला झोपेतून जागवणारे अण्णा हजारे निद्रिस्त असण्याचे राज काय ?

न्यूज नेटवर्क :-

काँग्रेस च्या कार्यकाळात अवघ्या देशात भ्रष्टाचार विरोधात जनतेला एकत्र करून माहिती अधिकार कायदा व इतर कायदे सरकारला करण्यास भाग पाडणारे व देशात पारदर्शक प्रशासन निर्माण होऊन सर्वसामान्य गोरगरिबांना त्यांचे न्याय हक्क मिळावे म्हणून ग्रामपंचायत स्थरावर आपला ठसा उमटविणारे जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे आता नेमक्या कोणत्या बिळात आहे ? हे कळायला मार्ग नसून राज्यात भ्रष्टाचार सर्वोच्च स्थानी पोहचला असतांना अण्णा हजारे यांचा निद्रिस्तपणा निश्चितच संशयास्पद आहे त्यामुळे त्यांना आता जागवायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. या संदर्भात अण्णांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी जागे व्हावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे.

देशातील सर्वाधिक प्रगतशील राज्य म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची वाळवी पोखरत आहे. खरं तर प्रशासनाच्या सर्वच विभागाला ही वाळवी लागल्याने राज्याच्या विकासाला खिळ बसण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळं समाजसुधारक आणि भ्रष्टाचाराविरोधात अवघ्या देशाला झोपेतून जागवणारे अण्णा हजारे गेल्या काही वर्षांपासून ‘निद्रिस्थ’ अवस्थेत असल्याने त्यांना आता कुणाची भीती आहे कां ? की ते फक्त काँग्रेस चे सरकार आल्यावरच मैदानात उतरेल ? असा प्रश्न जनतेतून विचारला जातं आहे.

राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट खात्यात महसुल खाते, पोलीस खाते, जलसंधारण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागासह उपप्रादेशिक परिवहन विभाग,राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न औषधी विभागाचा सहभाग असून या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतं आहे. व यामुळं देशाच्या विकासाला खीळ बसलेली आहे त्यामुळं अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उगारून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

दिल्लीत लोकपाल आंदोलनानंतर अण्णा अनपेक्षितरीत्या प्रकाशझोतातून बाहेर पडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अण्णांनी कुठलेही आंदोलन केले नाही.’भ्रष्टाचार स्वच्छता’ मोहिम आता अण्णांनी हाती घ्यावी, असे पाटील म्हणाले. राज्यातील लोकप्रतिनिधी आमदार-खासदार, सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, सुपर क्लास १, अ,ब श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या संपत्तीत दुपटीने वाढ होत आहे. अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीच्या स्त्रोताचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भ्रष्टाचारमुक्तीसाठी त्यामुळे अण्णा यांनी पुढाकार घ्यावा, असे पाटील म्हणाले.

Previous articleधक्कादायक ;- भद्रावती नगरपालिकेत नगरसेवकांचा पगार कामाच्या टक्केवारीतून? नगरसेवकच बनले ठेकेदार?
Next articleसंतापजनक :- विडियो व्हायरल होताच नगरसेवक वानखडेचा कारेकारवर हल्ला?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here