Home भद्रावती संतापजनक :- विडियो व्हायरल होताच नगरसेवक वानखडेचा कारेकारवर हल्ला?

संतापजनक :- विडियो व्हायरल होताच नगरसेवक वानखडेचा कारेकारवर हल्ला?

https://www.facebook.com/p.karekar22/videos/871571160588690/?mibextid=Nif5oz

सर्वपक्षीय नेते भद्रावती नगरपरिषदच्या भ्रष्ट कारभाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार?

भद्रावती :-

भद्रावती नगरपरिषदच्या सत्ताधाऱ्यांनी नगरसेवकांना महिन्यांचा पगार देऊन जणू त्यांना नौकर बनवण्याचा व स्वतःचं दुसऱ्यांच्या नांवावर कामे घेऊन कोट्यावधी रुपये कमाविण्याचा गोरखधंदा चालवला असल्याच्या चर्चा असताना आता घुटकाळा प्रभागाचे नगरसेवक विनोद वानखेडे यांचा नगरपरिषद ची सत्य हकीगत व्हायरल विडियो द्वारा समोर येताच त्यांनी माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांच्या घरी  त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या सोबत हातपाई व जीवे मारण्याची धमकी दिल्याने नगरपरिषद सत्ताधारी यांचा नवा ट्विस्ट समोर आला आहे. दरम्यान सत्ताधारीनगरसेवक यांची गुंडागर्दी भद्रावती शहरातील जनतेला संताप देणारीअसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांनी विद्यमान सत्ताधारी नगरसेवक विनोद वानखडे यांना नगरपरिषद च्या कामकाजाबाबत विचारले असता त्यांनी कोण किती टक्के घेतात व नगरसेवक कसे 6 हजार रुपये महिन्याला पगार घेतात याबाबत सांगितले व प्रशांत कारेकर यांनी त्याची रेकॉर्डिंग करून तो विडियो व्हायरल केला, त्यामुळं आता आपली काही खैर नाही व आपल्याला पुन्हा निवडणुकीत तिकीट मिळणार नाही आणि आपण पुन्हा नगरसेवक बनणार नाही या भीतीने नगरसेवक वानखडे यांनीं प्रशांत कारेकर यांनी विडियो व्हायरल न करण्याच्या मोबदल्यात ३ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करून त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला व अर्वाच्य, शिवराळ भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान तो व्हीडिओ सुद्धा व्हायरल झाल्याने सत्ताधारी नगरसेवक यांची किती दादागिरी वाढली हे स्पष्ट होतं असून या प्रकरणाला वेगळे वळण येऊन सत्ताधारी वगळता भद्रावती मधील सर्व पक्षातील नेते कार्यकर्ते एकत्र येऊन नगरपरिषद सत्ताधारी यांच्या विरोधात आक्रमक होण्याची माहिती आहे दरम्यान या नगरपरिषद कारभाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी सुद्धा विरोधक यांच्याकडून होणार असल्याची माहिती समोर आल्याने आता सत्ताधारी यांनी आजवर केलेला भ्रष्टाचार समोर येणार असल्याचे संकेत मिळत आहे.

Previous articleचिंताजनक:- महाराष्ट्र राज्यात लागली भ्रष्टाचाराची वाळवी,अण्णा हजारे मात्र निद्रिस्त ?
Next articleमिनी विधानसभेच्या निवडणुका लांबल्याने विकासकामांना बसली खीळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here