Home चंद्रपूर व्हॅलेन्टाईन डे’ला बांधल्या रेशीमगाठी

व्हॅलेन्टाईन डे’ला बांधल्या रेशीमगाठी

व्हॅलेन्टाईन डे’ला बांधल्या रेशीमगाठी

पाच जोडपी विवाहबद्ध; कुटुंबीयांच्या साक्षीने घेतली भावी जीवनाची शपथ

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर, ता. १५ : व्हॅलेन्टाईन डे हा प्रेम व्यक्त करणारा दिवस. या दिवशी जिवापाड प्रेम करणाऱ्या साथीदाराला प्रेमाची साद घातली जाते. आकर्षक भेटवस्तू देत प्रेमाचा सुरेख संदेश दिला जातो. जगभरातील प्रेमींनी १४ फेब्रुवारीला हा दिवस मोठ्या उत्साहात साजराही केला. तर, चंद्रपूर जिल्ह्यातील पाच जोडप्यांनी या प्रेमदिनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला. चंद्रपुरातील विवाह नोंदणी कार्यालयात रेशिमगाठ बांधत साथ जियेंगे साथ मरेंगेची शपथ घेतली. यावेळी कोणताही गाजावाजा न करता आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या जोडप्यांनी खरा व्हॅलेन्टाईन डे साजरा केला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पती-पत्नीचे नाते अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आहे. त्यामुळे प्रत्येक जोडी ही देवाघरून ठरविली जाते,

असे म्हटले जाते. प्रेम, काळजी या गोष्टीवरच हे नाते टिकून असते. पती-पत्नीला प्रेम व्यक्त करण्यासाठी

मुहूर्ताची गरज नसते. संपूर्ण आयुष्यभर प्रेम, काळजी घेणे आवश्यक आहे. तरीदेखील अनेक जोडपी व्हॅलेन्टाईन दिनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या साथीदाराला भेटवस्तू देत प्रेम व्यक्त करीत असतात.

सातजन्म सोबतीने घालविण्याचा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी

मागील काही वर्षांत सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अवघ्या दीड महिन्यांत ८७ जोडपी विवाहबद्ध झाली आहे. व्हॅलेन्टाईनदिनी जिल्ह्यातील पाच जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. – व्ही. आर. झाडे, सहायक दुय्यम निबंधक, चंद्रपूर

प्रेमदिनाची निवड करणे, हे निश्चितच

दीड महिन्यांत ८७ विवाह

मागील काही वर्षांत विवाह सोहळ्यावर भरमसाठ खर्च केला जात आहे. अनेक पालक आर्थिकस्थिती चांगली नसतानाही केवळ समाजात मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतात. एका दिवसाच्या या सोहळ्यावर भला मोठा खर्च करतात आणि पुढील आयुष्य कर्जाची परतफेड करण्यात घालवितात. कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्यास नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याच्या घटनाही समाजात घडल्या आहेत. अशा घटना समाजात घडू नये म्हणून शासनाने विवाह नोंदणी सुरू केली आहे. विवाह नोंदणी कार्यालयात कुटुंबीयांच्या साक्षीने साधेपणाने विवाह करणारेही याच समाजात आहेत. वर्षांत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चालू वर्षांत तब्बल ८७ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. यात व्हॅलेन्टाईनदिनी विवाहबद्ध झालेल्या पाच जोडप्यांचा समावेश आहे.

कौतुकास्पद आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील व्हॅलेन्टाईन डेला या जोडप्यांनी करार पाच जोडप्यांनी प्रेमदिनी आपला पत्रावर स्वाक्षऱ्या करीत प्रेमरुपी विवाह व्हावा, यासाठी विवाह नोंदणी नव्या आयुष्याची सुरवात केली ,

Previous articleबेरोजगारांना संधी मिळणार : १०१० पदांच्या आकृतीबंधास शासनाची मान्यता
Next articleअंचलेश्वर मंदिर येथे चार दिवसीय विविध भाषीय भजन महोत्सवाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here