Home चंद्रपूर देवाडा बुज प्रादेशिक नळयोजनेचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प

देवाडा बुज प्रादेशिक नळयोजनेचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प

नदीचे पात्र आटले : गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :-देवाडा (जुनगाव) पोंभूर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथे मागील तीन दिवसांपासून प्रादेशिक नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे येथील महिलांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.

काही लोकांनी तर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीतून पाणी आणणे सुरू केले आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागत असून नदीचे पात्र आटल्या गेल्याने नळ योजनेसाठी पाणीपुरवठा होणे ठप्प झालेले आहे. त्यातल्या त्यात वैनगंगा नदीमधून वाळूचा उपसा केला जात आहे. शेतकऱ्यांनी सुध्दा शेतीसाठी

मोटारपंपाद्वारे येथून पाणी घेणे सुरू ठेवले आहे.त्यामुळे नदीचे पात्र झपाट्याने आटत आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे गरजेचे असून त्याच धर्तीवर करीत आहेत.

नेहमीचीच समस्या

याठिकाणी उन्हाळा सुरु झाला की पाण्याच्या समस्या उद्भवत असतात. नदीला पाणी नसल्याने लाखो करोडो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचे बांधकाम करूनही पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून नदीला धरणाचे पाणी सोडण्यात यावे किंवा गावात पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.

गावातील नागरिक पाणी कर भरत असतात. नळ योजनेचा पाणीपुरवठा जनतेला मिळत नसेल तर पाणीकर भरायचा कशाला, असा प्रश्न नागरिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here