Home चंद्रपूर चंद्रपुरात शुक्रवारी दिव्यांगांचा आर्केस्ट्रा

चंद्रपुरात शुक्रवारी दिव्यांगांचा आर्केस्ट्रा

नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे राहणार उपस्थित

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर : दृष्टिहिन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था बल्लारपूरद्वारे संचालित सावित्रीबाई फुले अंध मुलींच्या वसतिगृहाच्य मदतीकरिता डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावतीतर्फे आर्केस्ट्राचे आयोजन २४ मार्चरोजी स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले असून, चंद्रपूरकरांनी या आर्केस्ट्राचा लाभ घेत दिव्यांग मुलींच्या वसतिगृहासाठी हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गेडाम यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

विशेष म्हणजे या आर्केष्ट्राला सैराट फेम

नागराज मंजुळे, आकाश ठोसर, ज्येष्ठ अभिनेते ,सयाजी शिंदे, अभिनेत्री सायली पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. ‘घे भरारी महिला मंच’ने दृष्टिहिन जनकल्याण संस्थेच्या वतीने आयोजित आर्केस्ट्राच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या आर्केस्ट्रातून दिव्यांग कलावंतांच्या कलांची उधळण होणार असून, हा आर्केस्ट्रा चंद्रपूरकर सांस्कृतिकप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष दिलीप गेडाम, सचिव सतिश शेंडे, घे भरारी महिला मंचच्या सुचिता ढेंगळे, रुपाली पाचभाई, सुजाता कांबळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here