Home भद्रावती भद्रावती शहरातील त्या तीन अवैध सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांवर कारवाई होईल ?

भद्रावती शहरातील त्या तीन अवैध सुगंधित तंबाखू व्यापाऱ्यांवर कारवाई होईल ?

सुगंधित तंबाखूच्या धंद्यात कोट्यावधीची उलाढाल. अन्न औषधी प्रशासन तंबाखूच्या गुंगीत तर पोलिसांची मेहरबानी ?

भद्रावती :-

ऐतेहसिक शहर म्हणून जिल्ह्यात प्रशिद्ध असणाऱ्या भद्रावती शहारात अनैतिक देहव्यापार पोलिसांनी उघड केल्याने अगोदरच हे शहर पोलीस अधीक्षक यांच्या हिटलिस्टवर असतांना या शहारात गेली अनेक वर्ष सुगंधित तंबाखू विकणारे पटेल, रंगारी व गायकवाड हे नेमके काय करताहेत ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांनी आपल्या काही हस्तकांना समोर करून सुगंधित तंबाखू विक्रीचा धंदा तर सुरू केला नसावा? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. दरम्यान भद्रावती शहरात सर्वत्र सुरू असलेल्या पानठेले नवीन ठाणेदार यांच्या आगमनाने दोन चार दिवस बंद करण्यात आले होते परंतु आता ते सुरू झाले असल्याने पोलिसांची आता अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना परवानगी तर मिळाली नाही ना ? असा संशय व्यक्त होतं आहे. दरम्यान कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या सुगंधित तंबाखू विक्रीच्या या खेळात अन्न औषधी प्रशासन तंबाखूच्या गुंगीत गप्प आहे तर पोलीस प्रशासन मात्र त्यांच्यावर मेहरबान असल्याची चर्चा असल्याने पोलीस प्रशासन त्या पटेल, रंगारी व गायकवाड सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवरकारवाई करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

भद्रावती शहरात शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याची व अवैध धंद्यावर अंकुश लावण्याची प्रमुख जबाबदारी असलेले पोलीस प्रशासन आता नवीन ठाणेदार इंगळे यांच्या नेत्रुत्वात काय भूमिका गाजवतात हा महत्वाचा प्रश्न दरम्यान अवैध सुगंधित तंबाखू सोबतच गावागावांत भद्रावती शहरातून जी अवैध दारू वाहतूक होते त्याला स्थानिक पोलीस प्रशासनाचा हातभार लागत असल्याची कुजबूज होतं असताना यावर पोलीस प्रशासनाद्वारे काय अंकुश लावल्या जातोय हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Previous articleमहानगर पालिकेतील सफाई ठेकेदारांची अजब मनमानी कामगारावर उपाशीमराची पाळी
Next articleचंद्रपुरात शुक्रवारी दिव्यांगांचा आर्केस्ट्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here