Home वरोरा गंभीर:- केंद्र व राज्य सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे शेतकरी संकटात?

गंभीर:- केंद्र व राज्य सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे शेतकरी संकटात?

माढेळी येथील पारस कॉटन मिल मधे कवडीमोल भावात कापसाची खरेदी. शेतकऱ्यांच्या भावना कोण समजणार ?

प्रतिनिधी (पवन ढोके )

केंद्र व राज्य सरकारच्या व्यापारी धोरनामुळे अगोदरच शेतकरी वर्ग खूप मोठा चिंतेत सापडला असताना आता मार्च एंडिंगच्या नावाखाली व्यापारी लोक सुद्धा शेतकऱ्यांना च्या मालाला कवडीमोल भाव देऊन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत असल्याची घटना माढेळी येतील सुप्रसिद्ध पारस कॉटन मिल येथे घडत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

कापसाचा भाव 7800 असे सांगून फक्त 6300 ला कापूस भाव लावून माढेळी येथील पारस कॉटन मिल प्रशासन शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट करत असल्याने शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे दरम्यान अगोदरच कापसाला किमान 10,000 भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला आज त्या कापसाला केवळ सहा साडेसहा हजार भाव मिळत असेल तर मग शेतकऱ्यांनी करायचे का ? हा प्रश्न उभा ठाकला आहे

 

 

कापसाच्या कमी किमंत लावल्यानंतर व्यापारी दलाल यांना विचारले असता ते म्हणतात की तुम्हचा कापूस उच्च श्रेणीचा नाही, मग कापसाची श्रेणी व्यापारी दलाल स्वमर्जिने ठरवणार तर व्यापाऱ्यांच्या हातात काय उरणार ? हा चिंतेचा विषय आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले असता तुमी विका नाही तर घरी घेऊन जा असे व्यापारांच्या दालालाकडून धमकीचे उत्तरे येत आहे. असल्या धमक्या मुळे शेतकऱ्यांनी कापूस आपला विकायचा कुठे? आणि विकला तर असा कवडीमोल भावात विकायचा कसा आणि कर्ज फेडायचे कसे हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. माढेळी येथील पारस कॉटन मधील दलाल मनमानी करत असल्याचे प्रकार समोर येत असल्याने याबाबत प्रशासन स्तरांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here