सामाजिक संसमताघर्ष समितीची मागणी
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:-आयपीएल सुरू झाल्यापासून चंद्रपूर शहरात कोट्यवधिंचा सट्टा खुलेआम चालतो आहे, मात्र पोलिस प्रशासन सट्टाकिंगला पाठीशी घालत असल्याने तरुण पिढी गारद होण्याच्या मार्गावर आहे. या सट्टाकिंगवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांनी केली जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना सादर केलेल्या निवेदनात शेख यांनी 2016 पासून शहरात सुरू असलेल्या आयपीएल सट्टा याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
चंद्रपूर शहरात राजू नामक सट्टाकिंग या बाजाराचा मास्टरमाईंड असल्याचे त्यांचे म्हणणे असून, पोलिस त्याचे पर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता आयपीएल सुरू झाले असून दररोज लाखोंचा सट्टा चालतो. सट्टाकिंग राजू तरुणांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवितो व सट्टा खेळण्यास बाध्य करतो. यासाठी शाळकरी मुलांचाही वापर केला जातो. या मुलांना कमिशन दिले जाते. त्यामुळे तरुण व शाळकरी मुले यात भरडले जात आहेत.
शहरात राजूसह इतर 7-8 जणांचे हे नेटवर्क असून ते सर्व शहरभर फिरुन ग्राहक टिपत असतात. काही तरुण यात हरल्यानंतर त्यांच्या कडून पैसे वसूल करण्यासाठी पालकांना धमकी दिली जाते व त्यानंतर घरघुती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्यापर्यंत या सट्टाकिंगची मजल गेली आहे. सदर सट्टाकिंगचे तेलंगणा पर्यंत नेटवर्क असल्याची माहिती आहे. पोलिस सध्या याबाबत जाणून आहेत, मात्र महिन्याकाठी कमीतकमी 70 लाखाची उलाढाल पोलिस व संबंधित यंत्रणेवर केली जात असल्याची माहिती या व्यवसायात कार्यरत असलेले खुलेआम देऊ लागले आहेत असे ही मो. इरफान शेख यांचे म्हणणे आहे. सदर राजू नामक सट्टाकिंगवर गुन्हे दाखल आहेत. शहरात हा प्रकार खुलेआम सुरू असून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी मो. इरफान शेख यांनी केली आहे.