सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या नाम फलकाचे अनावरण.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
स्वातंत्र्यवीर सावरकरांनीं प्राणांची आहुती देत,11 वर्ष अंदमानाची कालकोठडी भोगली.जगात सावरकर एकमात्र असे होते,ज्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली.या देशाच्या हितासाठी अंदमानच्या काल कोठडीत त्यांनी मरण यातना भोगल्या.त्यांच्या मनाचे खच्चीकरण व्हावे म्हणून जे जे करता येईल ते ते इंग्रजांनी केले.त्यांना बैला सारख जुंपण्यात आलं. भात कमी व सोंडे जास्त असलेले जेवण दिले. उलट्या झाल्यावरही त्यांना बसू दिल्या जात नव्हतं,अश्या मरण यातना दिल्या जात होत्या तरीही त्यांच्या मनात माझा देश स्वतंत्र व्हावा ही एकच भावना होती.मदनलाल धिंग्रा पासून नाशिकच्या कलेक्टर चा वध करणाऱ्या अनंत कान्हेरे पर्यंत प्रत्येकाची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरच होते. पण देशाचे स्वातंत्र्योत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना, या देशाचे स्वतःला प्रधानमंत्री पदाचे उमेदवार समजणारे राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात ही बाब असहनिय आहे.या विपरीत त्याच कालखंडात राहुल गांधींच्या आजोबाला इंग्रजांकडून कुक मिळायचा, एअर कंडिशन खोली दिली जात होती, लिहायला सचिव दिले जात होते. तरीही ते शूरवीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुम्ही भित्रा म्हणता.भित्रे तुम्ही अहात.ब्रिटनमध्ये शिकायला गेले तेव्हा आपलं नाव राहुल गांधी बदलून राहुल विंची केले,हा इतिहास आहे.तुम्ही आता म्हणता मी सावरकर नाही,गांधी आहो,हे सत्य नसून तुम्ही सावरकर नाही,गांधी पण नाही,राहुल विंची अहात.वीर सावरकर देशभक्त तर राहुल गांधी भित्रे आहेत अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
ते भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात नामफलकाचे अनावरण सोहळ्यात शुक्रवार 7 एप्रिलला बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)देवराव भोंगळे,जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे, महामंत्री राजेंद्र गांधी, रवींद्र गुरनुले, सुभाष कासंगोट्टुवार माजी उपमहापौर राहुल पावडे,चांद सैय्यद,धनराज कोवे,शिला चव्हाण,मुन्ना ठाकूर आदींची उपस्थिती होती.
*क्रांतिवीरांची नावे खुजे कराल तर याद राखा*
राहुल विंची यांचे कनेक्शन इटलीशी आहे.त्याची आत्या मावशी इटलीची आहे.आमचं जीन महाराणा प्रताप,छत्रपती शिवाजी महाराज,शाहीदे आजम भगतसिंग,राजगुरू,चंद्रशेखर आझाद यांचं आहे.आमचं जीन भरतमातेशी जुळलं आहे.हा विरोध जनते पर्यंत पोहोचवायचा आहे.सहनशीलतेचा आता अंत झाला आहे.तुम्ही स्वतःला सर्वात मोठा बुद्धिमान समजून स्वतःची पाठ थोपटून घ्या.आमचा आक्षेप नाही.परंतु क्रांतिवीरांच्या यादीत ज्यांची नावे येतात ती खुजे कराल तर याद राखा असा इशारा ना.मुनगंटीवार यांनी काँग्रेसला दिला.
*हा काँग्रेसच्या निचते विरुद्ध संघर्ष*
देश आता क्रांतिवीरांचा अपमान सहन करणार नाही.काँग्रेस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु बाबत नीच शब्द वापरते.10 बाय 10 च्या खोलीतील आमची ही आदिवासी बहीण 350 एकरच्या राष्ट्पती भवनात राष्ट्रपती म्हणून गेली,तर यांच्या पोटात दुखते. काँग्रेसी तिला राष्ट्रपत्नी संबोधतात.इतकी नीच वृत्ती काँग्रेसची आहे.या निचते विरुद्ध आपला संघर्ष आहे,असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.