Home चंद्रपूर स्विकार दुर्बल मतिमंद मुलांच्या निवासी शाळेवर चौकशी समिती नेमली.

स्विकार दुर्बल मतिमंद मुलांच्या निवासी शाळेवर चौकशी समिती नेमली.

मनसेच्या दिव्यांग आयुक्तांकडे केलेल्या मागणीची दखल, संस्थेचा अनागोंदी कारभार येणार चव्हाट्यावर.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत स्विकार दुर्बल मनरक (मतिमंद) मुलांची निवासी शाळा ताडाळी, (तालुका जिल्हा चंद्रपूर) येथे संस्थेच्या सचिव रेखाताई पिंपळशेंडे ह्या अरेरावी करून येथील कर्मचाऱ्यांच्या पगारातून दिव्यांग शाळेच्या मुलांचा खर्च मागतात व विद्यार्थ्याना शासनाकडून मिळणारे खावटी अनुदान स्वतः लट्टालूट करतात असा गंभीर आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी याबाबत दिव्यांग विकास आयुक्त पुणे यांच्यासह जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून तक्रार केली होती, त्या तक्रारीची दखल घेऊन समाजकल्याण अधिकारी यांच्या अधिनस्त आता या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली गेली असल्याचे स्वतः समाजकल्याण अधिकारी पेन्दाम यांनी कळवले आहे.

स्विकार दुर्बल मतिमंद मुलांच्या निवासी शाळेवर संस्थेच अध्यक्ष नितीन गोरेश्वर पिंपळशेंडे हे शाळेच्या हजरी पटावर शिपाई म्हणून दाखवल्या जाते आणि ते पंधरा दिवसातून एकवेळा शाळेत येऊन हजेरी बुकावर सह्या करून जातात पण ते या शाळेत कामकाजचं करीत नसून केवळ शिपाई पदाचा पगार उचलतात व शासनाची फसवणूक करीत आहे. दरम्यान ही बाब समाजकल्याण अधिकारी यांना माहिती असतांना त्यांच्या माध्यमातून याबाबत कुठलीही कारवाई केल्या जातं नाही त्यामुळं संस्थेच्या सचिव यांचे स्थानिक प्रशासनासोबत साटेलोटे असल्याची बाब समोर येत आहे.

या संस्थेचा बचाव करणारे कोण ?

कुठल्याही संस्थेच्या भ्रष्टाचार व अनियमितता याकडे डोळेझाक कां होते तर त्या संस्थेला मंत्रालय स्थरावर पाठबळ मिळते असेच पाठबळ मुंबई मंत्रालयातील पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागात प्रधान सचिव असलेल्या जे. पी गुप्ता यांचे स्विकार दुर्बल मतिमंद मुलांच्या निवासी शाळेच्या संस्था सचिव पिंपळशेंडे यांना मिळत असल्याने या संस्थेवर कारवाई होतांना दिसत नाही.

दरम्यान संस्था सचिव यांच्या अरेरावीने येथील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्याने प्रशासक बसविण्यात आले होते, सन 2018 ला या शाळेवर प्रशासक बसल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनीच शाळेतील दिव्यांग मुलांचा खावटी खर्च केला होता, मात्र सन 2019 मधे जेंव्हा पुन्हा संस्थेच्या सचिवांकडे कारभार आल्यानंतर त्यांनी प्रशासक काळातील विद्यार्थ्यांच्या खावटी खर्चाचे अनुदान सुद्धा जोरजबरदस्तीने लाटले होते ते अनुदान मुंबई मंत्रालयातील पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागात प्रधान सचिव असलेल्या जे. पी गुप्ता यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून संस्थेच्या खात्यात देण्यास सांगितले असल्याची माहिती आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांनी प्रशासक असलेल्या काळात केलेला खर्च सुद्धा संस्थेच्या सचिवाने लाटल्याने संस्थेच्या सचिवांच्या करामतीच संस्थेला मारक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here