Home चंद्रपूर गुड फ्रायडे निमित्त निघालेल्या रन ऑफ जीसस रैलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने...

गुड फ्रायडे निमित्त निघालेल्या रन ऑफ जीसस रैलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जगीं स्वागत करत शितपेयाचे वाटप

 

 

 

चंद्रपुर :- गुड फ्रायडे निमित्त काढण्यात आलेल्या रन ऑफ जीसस रैलीचे आंद्रिय देवालय येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रैलीत सहभागी समाज बांधवांना शित पेयाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, हेरमन जोसेफ, विलास वनकर, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गुड फ्रायडे निमित्त आंद्रिय देवालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रन ऑफ जीसस रैलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ०७,००, वाजता आंद्रिय देवालय येथून या रैलीला सुरुवात झाली. जटपूरा गेटला वळसा घालुन रैली पून्हा जयंत टॉकीज जवळील आंद्रिय देवालय येथे पोहचली येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रैलीचे स्वागत करत सहभागी समाज बांधवांना शित पेयाचे वाटप करण्यात आले.

Previous articleपक्षाची संघटन बांधणी करून पक्षाची ताकत उभारा.
Next articleमार्मिक :- लता मंगेशकर यांचे मृत्युपूर्वी रुग्णालयातील शेवटचे शब्द.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here